फुकट्यांची आता खैर नाही! शेकडो टीसींचे ताफे तैनात, एकट्या कल्याण स्थानकावर 16 लाख वसूल

 कल्याण रेल्वे स्थानकात 167 टीसी तैनात आहेत. फुकट्या प्रवाशांकडून एका दिवसात 16.85 लाखांची दंड वसुली करण्यात आली. 

Oct 17, 2023, 18:36 PM IST
1/7

कल्याण हे मध्य रेल्वे मार्गावरील सर्वात गजबजलेले रेल्वे स्थानक आहे. अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे देखील येथे थांबातात. हजारो प्रवासी या रेल्वे स्थानकात विना तिकीट प्रवास करतात.  

2/7

कल्याण रेल्वे स्थानकातून हजारो प्रवासी प्रवास करतात. सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वे येथे थांबत असल्याने CSMT तसेच दादर रेल्वे स्थानकातून अनेक प्रवासी विनातिकीट या  लांब पल्ल्याच्या रेल्वेने कल्याण स्थानकापर्यंतचा प्रवास करतात.   

3/7

 4438 हजार फुकट्या प्रवाशांकडून 16.85 लाखांची दंड वसुल करण्यात आला आहे. 

4/7

कारवाईला विरोध करणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांची देखील मदत घेण्यात आली. 35 पेक्षा जास्त रेल्वे पोलिस 167 टीसींच्या मदतीसाठी तैनात होते.   

5/7

सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत तब्बल 4438 हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. 

6/7

16 ऑक्टोबर रोजी मध्ये रेल्वे मार्फत कल्याण रेल्वे स्थानकात सर्वात मोठे तिकीट तपासणी अभियान राबवण्यात आले. 

7/7

विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची झाडाझडती घेण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात तब्बल 167 टीसी तैनात आहेत.