Toll Charges : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील टोलच्या दरात तब्बल 18 टक्के वाढ; कोणत्या वाहनाला किती पैसे भरावे लागणार?

Mumbai Pune Expressway Toll Charges : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोल१८ टक्क्यांनी वाढणार आहे, 1 एप्रिलपासून या दरवाढीची अंमलबजावणी होणार आहे. 

Mar 28, 2023, 17:43 PM IST

Mumbai Pune Expressway Toll Charges : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील प्रवास महागणार आहे. कारण एक्स्प्रेस वेवरील टोलच्या दरात तब्बल 18 टक्के वाढ होणार आहे. हे नवे दर 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. यामुळे पुन्हा एकदा वाहन चालकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. 

1/6

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे हा सहा पदरी मेगाहाय वे आहे. 

2/6

जलद आणि सुपरफास्ट प्रवासासाठी प्रवाशी मुंबई पुणे एक्सप्रेसवेला पसंती देतात. 

3/6

टोलवाढ अन्यायकारक असून कोणताही राजकीय पक्ष याबाबत का आवाज उठवत नाही असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलनकर यांनी उपस्थित केला आहे, 

4/6

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरुन दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात.

5/6

अनेक खाजगी बसेस देखील या मार्गावरुन प्रवास करतात. यामुळे बस ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील याचा फटका बसू शकतो.

6/6

या दरवाढीमुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.