महिंद्राच्या XUV500 Facelift लाँच, जबरदस्त फिचर्स...

Apr 19, 2018, 08:38 AM IST
1/7

2018 Mahindra XUV500 facelift launched

2018 Mahindra XUV500 facelift launched

महिंद्राने आपल्या सर्वात डिमांडिग कार XUV500 फेसलिस्ट 2018 मॉडेलला भारतीय बाजारात लाँच केलं आहे. XUV500 फेसलिस्ट एक 7 सीटर क्रॉसओव्हर आहे. ज्यामध्ये डिझेल आणि पेट्रोल इंजिन देखील उपलब्ध आहे. कंपनीने या कारला 12.32 लाखमध्ये शोरूममध्ये लाँच केली आहे. 

2/7

Mahindra XUV500 facelift launched in India

Mahindra XUV500 facelift launched in India

XUV500 फेसलिफ्टमध्ये अनेक कॉस्मेटिक बदल देखील केले आहे. यामध्ये क्रोम प्लेटेड ग्रिल आणि रॅपराऊंड प्रॉजेक्टर्स दिले आहेत. फ्रंट बंपनमध्ये क्रोमचा वापर केला आहे. यासोबत महिंद्र XUV500 फेसलिस्ट रॅपराऊंट एलईडी टॅललॅप्स देण्यात आलं आहे. 

3/7

Mahindra XUV500 Facelift price in India

Mahindra XUV500 Facelift price in India

महिंद्र XUV500 डीझेल इंजिनमध्ये 5 वेरिएंट्स ऑप्शंससोबत देण्यात आलं आहे. पेट्रोल वर्झनमध्ये फक्त एक वेरिएंट मिळणार आहे. पेट्रोल वेरिएंटमध्ये पूर्णपणे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असणार आहे. डीझेल वेरिएंटबद्दल बोलायचं झालं तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सुविधा मिळणार आङे. पेट्रोल मॉडेलची किंमत ही 15.42 लाख रुपये आहे तर डीझेल मॉडेलची किंमत 12.32 लाख रुपयांपासून 17.88 लाखापर्यंत असणार आहे. 

4/7

2018 Mahindra XUV500 Facelift Features

2018 Mahindra XUV500 Facelift Features

या XUV500 मध्ये इंफोटेनमेंट सिस्टम, सेंट्रल कंसोपवर पियानो ब्लॅक फिनिशिंग आहे. तसेच स्टीअरिंग व्हिल, सेंट्रल कंसोल, सेंटर आर्मरेस्ट, गियर नोब आणि हँडब्रेकवर सिल्वर फिनिशिंग मिळणार आहे. कारच्या इंटिरिअर लूक हा अतिशय प्रीमियम बनवला आहे. डॅशबोर्ड लेआऊट आणि डिझाइन एकसारखंच आहे. यामध्ये टचस्क्रिनला अपडेट केलं आहे. XUV500 फेसलिफ्टमध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, रिवर्स पार्किंग कॅमेरा, पुश बटन स्टार्क फंक्शन आणि कीलेस एंट्री सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. 

5/7

2018 Mahindra XUV500 Facelift engine options

2018 Mahindra XUV500 Facelift engine options

इंजिनबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 2.2 लीटर पेट्रोल आणि डिझेन इंजिन आहे. यातील पेट्रोल इंजीनला 140PS ची पावर आणि 320 NM चे टॉर्क जेनरेट केलं आहे. डिझेल इंजिन 140 पीएसची पॉवर आणि 330 एनएमची टॉर्क जेनरेट आहे. फेसलिफ्ट XUV500 च्या टॉप वेरिएंटमध्ये अपडेट 2.2 लीटल mHawk टर्बो चार्ज्ड डीझेल इंजिन आहे.   

6/7

Newly 2018 Mahindra XUV500 Facelift

Newly 2018 Mahindra XUV500 Facelift

कंपनीने नव्या XUV500 च्या साइजमध्ये कोणताही बदल केलेला नाही. याची लांबी 4585mm, रूंदी 1890mm, उंची 1785mm आणि व्हीलबेस 2700mm अशी आहे. मात्र कंपनीने या कारच्या लूक्सला अगदी स्पोर्टी केलं आहे. त्यामुळे या गाडीला अधिक पसंती मिळेल यात शंका नाही.   

7/7

Newly Mahindra XUV500 Facelift launch

Newly Mahindra XUV500 Facelift launch

नवीन XUV500 ही सात रंगात उपलब्ध होणार. क्रिमसन रेड, मायस्टिक कॉपर, ऑपुलेंट पर्पल, वॉलकॅनो ब्लॅक, लेक साइड ब्राऊन, पर्ल व्हाइट आणि मूनडस्ट सिल्वर यासारखे सात रंग या मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. भारतीय बाजारात या गाडीची टक्कर जीप कप्मस आणि टाटा हेक्सासोबत होणार आहे. नवीन प्लॅटफॉर्मसोबत बनणारी ही महिंद्रा XUV500 चा पुढील मॉडेल भारतात 2020 मध्ये येणार आहे.