Instagram पोस्टसाठी ख्रिस्तियानो रोनाल्डो घेतो 26 कोटी रुपये, विराट आणि प्रियंका किती मानधान घेतात?

2023 Instagram Rich List: इन्स्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) पुन्हा एका बाजी मारली आहे. सलग तिसऱ्यांदा रोनाल्डोने हा बहुमान पटकावला आहे. रोनाल्डोनंतर लिओनेल मेस्सीचा (Lionel Messi) दुसरा क्रमांक आहे. या यादीत टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री प्रियंका चोप्राचाही समावेश आहे. 

राजीव कासले | Aug 11, 2023, 18:14 PM IST
1/5

प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियान रोनाल्डो पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणारा सेलिब्रेटी ठरला आहे. रोनाल्डो एका पोस्टसाठी तब्बल 26 कोटी रुपये घेतो. या यादीत सलग तिसऱ्या वर्षी रोनाल्डोने अव्वल क्रमांक पटकावला आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीतही रोनाल्डो टॉपला होता. आता 2023 च्या इन्स्टाग्राम रिच लिस्टमध्येही तो अव्वल स्थानावर आहे. 

2/5

सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रेटींची यादी इंस्टाग्राम शेड्यूलिंग टूल हॉपर हेडक्वार्टरने तयार केली आहे. इन्स्टाग्रामवर त्या सेलिब्रेटीची लोकप्रियता आणि फॉलोअर्सच्या आधारावर ही यादी तयार करण्यात आली आहे. रोनाल्डोचे 60 कोटी फॉलोअर्स आहेत. 

3/5

इन्स्टाग्रामच्या नव्या यादीत रोनाल्डोचा प्रतिस्पर्धी आणि प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी दुसऱ्या क्रमांकावर आहे. मेस्सी इन्स्टाग्रामच्या प्रत्येक पोस्टसाठी 21.52 कोटी रुपये मानधन घेतो. कोणत्याही क्षेत्रातल्या सेलिब्रेटिंच्या तुलनेत रोनाल्डो आणि मेस्सीची कमाई सर्वाधिक आहे. 

4/5

गायिक आणि अभिनेत्री सेलेना गोमेज, रियालिटी स्टार आणि  मेकअप मुगल काइली जेनर आणि अभिनेता ड्वेन  'द रॉक' जॉनसन जेसी सारखे प्रसिद्ध सेलिब्रेटीही रोनाल्ड आणि मेस्सीच्या मागे आहेत. याशिवाय नेयमार आणि किलियन एम्बाप्पे यांचाही या यादीत समावेश आहे. 

5/5

या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राचाही समावेश आहे. विराट कोहली एका इन्स्टा पोस्टसाठी 11.45 कोटी रुपये घेतो. विराट या यादीत टॉप 20 त आहे. तर प्रियंका चोप्रा या यादीत 29 व्या क्रमांकावर असून ती एका इन्स्टा पोस्टसाठी 4.40 कोटी रुपये घेते. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x