Guru Gochar : 'या' राशींसाठी 2024 असणार लकी; गुरु गोचरमुळे मिळणार सन्मान आणि पैसाच पैसा

Jupiter Transit in Taurus : ग्रहांचा गुरू बृहस्पति याला वैदिक ज्योतिषशास्त्रात देवगुरु म्हटलं जातं. या गुरुदेवामुळे येणार नवीन वर्ष 2024 वर्ष काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

Oct 14, 2023, 15:48 PM IST

Jupiter Transit in Taurus :  गुरु ग्रह हा एका राशीत 13 महिने असतो. तो सध्या मेष राशीत असून नवीन वर्षात 2024 मध्ये तो वृषभ राशीत संक्रमण करणार आहे. त्यामुळे नवीन वर्ष काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

1/7

वैदिक ज्योतिषशास्त्रनुसार 1 मे 2024 ला दुपारी 12:59 वाजता गुरू मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर 12 जून रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. मग गुरू 9 ऑक्टोबरला प्रतिगामी होईल आणि 4 फेब्रुवारी 2025 पर्यंत प्रतिगामी (वक्री) राहणार आहे. यानंतर, 4 फेब्रुवारीला मार्गी होणार आणि 14 मे  रात्री 10:36 वाजता 2025 पर्यंत वृषभ राशीत राहणार आहे. 

2/7

सर्व ग्रहांमध्ये गुरूला महत्त्वाचं स्थान आहे. गुरु हा धनु आणि मीन राशीचा शासक ग्रह आहे. तर संपत्ती, मुलं, विवाह, धार्मिक कार्य याचा कारक आहे. त्यामुळे गुरुचा स्थिती बदलाने जाचकाचे नशीब उजळून निघतं. 

3/7

कर्क (Cancer)

2024 मध्ये गुरूच्या राशीत बदलानंतर गुरू हा कर्क राशीच्या अकराव्या घरात स्थित होणार आहे. हे घर उत्पन्नाचं असल्याने या लोकांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. तुम्हाला नवीन नोकरीची संधी मिळणार आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. व्यावसायिकांसाठी गुरु गोचर यश आणि प्रगती घेऊन आला आहे. अविवाहित लोकांच्या आयुष्यात जोडीदाराची एन्ट्री होणार आहे.   

4/7

वृश्चिक (Scorpio)

2024 हे वर्ष वृश्चिक राशीसाठी भाग्यशाली ठरणार आहे. गुरु या राशीच्या सातव्या भावात स्थित होणार आहे. या लोकांच्या विवाहिक जीवनात आनंदाचे वारे वाहणार आहे. या लोकांच्या सुखात आणि सौभाग्यात वाढ होणार आहे. अविवाहित लोकांना लग्नाचा चांगला प्रस्ताव येणार आहे. तुम्हाला नशिबाची साथ काय असते याची अनुभूती मिळणार आहे.  

5/7

मेष (Aries)

या राशीसाठी येणार 2024 हे वर्ष अतिशय आनंदायी आणि धनलाभ घेऊन येणार आहे. या लोकांना अचानक आर्थिक फायदा होणार आहे. तुम्ही तुमच्या वाणीने लोकांची मनं जिंकणार आहात. गुरु कृपेने तुम्ही पैशाची बचत करण्यात यशस्वी होणार आहात. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. कर्जापासून तुम्हाला मुक्ती मिळेल. 

6/7

सिंह (Leo)

येणार 2024 हे वर्ष सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मान सन्मानसोबत प्रगती होणार आहे. मुलांबद्दल आनंदाची बातमी मिळणार आहे. व्यवसायिकांना बिझनेसमध्ये मोठा नफा होणार आहे. सरकारी नोकरी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. 

7/7

कन्या (Virgo)

गुरु गोचरमुळे कन्या राशीच्या लोकांना भाग्यशाली ठरणार आहे. 2024 हे वर्ष त्यांच्यासाठी नशिबाचे दरवाजे उघणार ठरणार आहे. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचा मोबदला त्यांना मिळणार आहे. गाडी किंवा मालमत्ता खरेदीचे योग आहेत. अविवाहित लोकांना त्यांचा जोडीदार मिळणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)