नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये भारतात फिरण्यासाठी 5 सर्वात स्वस्त ठिकाण; एकदा फोटो पाहाच

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कुटुंब किंवा मित्रांसोबत फिरायला जाण्यासाठी भारतातील सर्वात Best ठिकाण... पाहा फोटो

Nov 15, 2022, 13:12 PM IST

नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये सुट्टी असते. त्यामुळे अनेक जण बाहेर फिरायला जाण्याच्या विचार करत असतात. त्यामुळे चर्चा सुरु होते, फिरायला कोठे जाणार, किती दिवस जाणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खर्च किती लागणार? (hot beach destinations in india) तर आज आम्ही तुम्हाला काही असे ठिकाण सांगणार आहोत, ज्याठिकाणी तुम्ही कमी खर्चात सुट्ट्यांचा आनंद लूटू  शकतात (cheap holiday destinations in india).... जाणून घ्या असे भारतातील असे  5 ठिकाणी जेथे तुम्हाला कमी खर्चात फिरता येईल... 

 

1/5

जैसलमेर (Jaisarmer)

Jaisarmer

जैसलमेर शहराची ओळख 'गोल्डन सिटी' म्हणून देखील आहे. वाळवंटातील सफारी, भव्य जैसलमेर किल्ला, राष्ट्रीय उद्यान, ऐतिहासिक कुलधारा गाव, उत्कृष्ट जैन मंदिरे, कलात्मक ताजिया टॉवर आणि बादल पॅलेस... असे अनेक प्रेक्षणीय स्थळे जैसलमेरमध्ये आहेत.  जैसलमेरमध्ये 2 जणांचा फिरण्याचा खर्च - चार दिवस आणि तीन रात्र - 10 ते 12 हजार 

2/5

गोवा (Goa)

Goa

तरुणांसाठी तर गोवा आकर्षणाचं ठिकाण आहे. पण नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात गोव्यात फिरायला जाण्याचा आनंद फार वेगळा आहे. ख्रिसमस पार्टी आणि नवीन वर्षाचं स्वागत तुम्ही गोव्यात करू शकता.  गोव्यात फिरण्यासाठी 2 जणांचा फिरण्याचा खर्च - चार दिवस आणि तीन रात्र - 12 ते 15 हजार   

3/5

औली (Auli)

Auli

नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये औलीमध्ये बर्फवृष्टी होत असते. ज्यामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. वातावरणातील या बदलाचे पडसाद दिल्लीतही दिसून येतात. म्हणून या महिन्यात फिरण्यासाठी औली एक उत्तम पर्याय आहे.  औलीला फिरण्याचा खर्च - तीन दिवस 16 हजार 

4/5

मनाली, हिमाचल प्रदेश

मनाली, हिमाचल प्रदेश

नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये फिरण्यासाठी मनाली उत्तम पर्याय आहे. हिमाचल प्रदेशातील हे सुंदर हिल स्टेशन उत्तर भारतातील सर्वात जास्त मागणी असलेल्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे. औलीला फिरण्याचा खर्च - तीन दिवस 12 हजार 

5/5

कूर्गमधील कॉफीचे मळे ( coffee plantations in Coorg)

coffee plantations in Coorg

दक्षिण भारतातील सुंदर शहरांमध्ये कुर्गची गणना होते. याला कॉफीचे शहर म्हणूनही ओळखलं जातं. यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक कुर्गला भेट देण्यासाठी येतात. याशिवाय कूर्गची ओळख रोमँटिक हनीमून डेस्टिनेशन अशी देखील होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी हनीमूनसाठी कुर्गला जावू शकता.  कूर्गमध्ये 2 जणांचा फिरण्याचा खर्च - तीन दिवस आणि दोन रात्र - 15 हजार