निवृत्तीनंतर यशस्वी प्रशिक्षक झालेले 7 क्रिकेटपटू

Jul 22, 2020, 16:21 PM IST
1/7

अनिल कुंबळे

अनिल कुंबळे

भारतीय संघाचे जंबो म्हणजेच अनिल कुंबळे याला सन 2016 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक बनविण्यात आले होते. कुंबळे आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली कधीही एकमेकांसोबत जमलं नाही. म्हणूनच कुंबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. कुंबळेच्या कोचिंगमध्ये टीम चांगली कामगिरी करत होती. कुंबळे हे जगातील एक उत्कृष्ट फिरकीपटू मानले जातात. अनिल कुंबळे यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक विक्रम नोंदवले आहेत. त्याचवेळी 500 विकेट घेण्याचा विक्रम करणारे कुंबळे हे पहिले भारतीय गोलंदाज आहेत. यासह कुंबळे हे भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधारही होते. कसोटीत त्यांनी 619 विकेट्स घेतल्या आहेत तर कसोटी सामन्यात 74 धावा देऊन 10 विकेट घेण्याचा रेकॉर्ड देखील त्यांच्या नावावर नोंद आहे.

2/7

जॉन राईट

जॉन राईट

न्यूझीलंडचे माजी कर्णधार आणि फलंदाज आणि प्रशिक्षक जॉन राईट य़ांनी आपल्या कारकीर्दीत एकूण 82 कसोटी सामने आणि 149 एकदिवसीय सामने खेळले आहेत. राईट यांनी कसोटी क्रिकेट आणि एकदिवसीय सामन्यात 5334 धावा केल्या आहेत. जॉन राईट हे 2000 ते 2005 या काळात टीम इंडियाचे प्रशिक्षकही होते. त्याच्या प्रशिक्षणाखाली भारताने 2003 च्या विश्वचषक फायनलमध्ये प्रवेश केला होता. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धची स्थानिक कसोटी मालिका जिंकली. त्याचबरोबर राईट हे 2013 आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षकही होते.

3/7

डेव व्हाटमोर

डेव व्हाटमोर

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डेव्ह व्हाटमोर सध्या बडोदा रणजी संघाचे प्रशिक्षक आहेत. व्हाटमोर यांनी त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत एकूण 7 कसोटी आणि 1 वनडे सामना खेळला आहे. याशिवाय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी व्हिक्टोरियासाठी 6,000 पेक्षा अधिक धावाही केल्या. नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ते क्रिकेट प्रशिक्षक झाले. व्हाटमोर यांनी श्रीलंकेच्या संघाला दोन वेगवेगळ्या वेळी प्रशिक्षण दिले आणि याच काळात श्रीलंकेच्या संघाने 1996 चा विश्वचषक जिंकला. या दोन अंतरांदरम्यान डेव्ह व्हाटमोर यांनी लंकाशायर संघाला देखील प्रशिक्षण दिले. त्यांच्या संघाने 1998 आणि 1999 मध्ये नॅशनल लीग आणि 1998 मध्ये नॅटवेस्ट करंडक जिंकला. व्हाटमोर हे बांगलादेश क्रिकेट संघाचे प्रशिक्षकही राहिले आहेत.

4/7

टॉम मूडी

टॉम मूडी

ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक टॉम मूडीने आपल्या कारकीर्दीत एकूण 8 कसोटी आणि 76 एकदिवसीय सामने खेळले आहेत. मूडी श्रीलंकेच्या संघाचे प्रशिक्षकही राहिले आहेत. त्याशिवाय 2013 च्या आयपीएलमध्ये मूडी सनरायझर्स हैदराबादचे प्रशिक्षक होते. तसेच टॉम मूडी चॅनल नाइन आणि चॅनल टेनचे कमेंटेटरही होते.

5/7

बॉब वूल्मर

बॉब वूल्मर

पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक बॉब वूल्मर यांचा जन्म भारताच्या कानपूर शहरात झाला. इंग्लंडच्या या फलंदाजाने 1975 साली कसोटी कारकीर्दीला सुरुवात केली. बॉब वूल्मर हे असे उत्कृष्ट खेळाडू होते की, त्यांना वर्ल्ड सिरीज क्रिकेटसाठी कॅरी पॅकरनेसुद्धा सही करुन निवडले होते. सेवानिवृत्तीनंतर बॉब वूल्मर हे एक अतिशय प्रसिद्ध कोच झाले. ते दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचे प्रशिक्षक होते. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज क्रिकेट संघाला देखील त्यांना आपला प्रशिक्षक बनवण्याची इच्छा होती. 18 मार्च 2007 रोजी बॉब वूल्मर यांचे निधन झाले.

6/7

गॅरी कर्स्टन

गॅरी कर्स्टन

दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन एक उत्कृष्ट सलामीवीर म्हणून ओळखले जातात. कर्स्टन यांनी 1993 ते 2004 दरम्यान त्यांच्या संघासाठी 101 कसोटी आणि 185 एकदिवसीय सामने खेळले आहेत. कर्स्टन यांच्या प्रशिक्षणाखालीच टीम इंडियाने 2011 चा वर्ल्ड कप जिंकला होता.

7/7

राहुल द्रविड

राहुल द्रविड

2015 साली राहुल द्रविडला इंडिया-ए आणि अंडर 19 संघांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. द्रविडच्या प्रशिक्षणात भारतीय अंडर-19 संघाने 2018 चा विश्वचषक जिंकला होता. प्रशिक्षक म्हणून केलेल्या उत्कृष्ट कामगिरीनंतर बीसीसीआयने द्रविडला नॅशनल क्रिकेट कॅडमीचे प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे.