घराच्या जवळपास भटकणारही नाहीत साप; 'या' 7 गोष्टींना घाबरतात

पावसाळा सुरु झाला की, घराच्या जवळपास साप आढळत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहे. असं असताना साप कोणत्या 10 गोष्टींना घाबरतात, ते जाणून घेऊया. 

| Jul 09, 2024, 13:26 PM IST

उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमध्ये एका तरुणाला चक्का सहाव्यांदा सर्पदंश झाला आहे. या सापाने तरुणाने तब्बल सहावेळा दंश केला आहे. यामध्ये तरुणाचा जीव सुदैवाने वाचला आहे. पावसाळा सुरु झाला की, गावाकडे किंवा मोकळा परिसर असलेल्या घरांच्या शेजारी झाडी, गवत वाढते. अशावेळी यामध्ये साप किंवा इतर किटक, जनावरे आढळतात. मोकळ्या जागी मुलं किंवा आपण सहज वारवर असतो. अशावेळी साप चावण्याची दाट शक्यता असतो. तेव्हा प्रत्येकाने आपल्या घराबाहेर 'या' 10 गोष्टी ठेवाव्यात ज्यामुळे साप फिरकणार देखील नाही. 

1/7

ब्लिचिंग पावडर

साफ, इतर किटक जनावरे आणि प्राण्यांना घरापासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही ब्लिचिंग पावडर वापरु शकता. तसेच घराजवळ आणि बागेतही याची फवारणी करु शकता. 

2/7

खास मिश्रण

 दालचिनी पावडर, पांढरा व्हिनेगर किंवा लिंबाचा रस मिक्स करून घराबाहेर फवारू शकता. ज्या ठिकाणी साप येण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी नियमित फवारणी करावी.

3/7

साप या झाडांना घाबरतो

निवडुंग, स्नेक प्लांट, तुळशीचे झाड, लेमन ग्रास इत्यादींची पावसाळ्यात लागवड करणे आवश्यक आहे. कारण साप या झाडांना घाबरतो.   

4/7

पेस्ट

कांदा आणि लसूणची पेस्ट सापांना घरापासून दूर ठेवण्यासाठी मदत करतात. साप या पेस्टचा वास आल्यास पळून जातात. घराशेजारी कांदा आणि लसूण लावणे महत्त्वाचे.   

5/7

सर्पगंधा

सर्पगंधा देखील अशीच एक वनस्पती आहे, सापाला त्याच्या जवळ यायला आवडत नाही. त्याचा वास खूप तिखट आहे. तुम्ही ते तुमच्या घराच्या बागेत किंवा कुंडीत लावू शकता. सापांना दूर ठेवण्यासाठी तुम्ही पावसाळ्यातही हे रोप लावू शकता.

6/7

विनेगर

घरातून सापांना हाकलण्याचा उत्तम मार्ग म्हणजे बाहेर पडण्याची जागा सोडून घरात विनेगर फवारणे. त्याऐवजी, तुम्ही फिनाइल किंवा केरोसीन तेल देखील फवारू शकता.  

7/7

परिसर स्वच्छ ठेवा

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साप घराजवळ टाळायचे असेल तर परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. कारण अडगळीच्या ठिकाणी किंवा जेथे अस्वच्छता असते तेथे सापाचा वावर वाढतो.