जगप्रसिद्ध अभिनेत्याचा गूढ मृत्यू! त्याच्याच कारमध्ये सापडला मृतदेह; 'ऑस्कर्स' ही जिंकलेला

Actor Of Oscar Winning Movie Found Dead In A Car: एका बगीचाजवळ पार्क केलेल्या कारमध्ये त्याचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या चित्रपटातील त्याची भूमिका चांगलीच गाजली होती.

| Dec 27, 2023, 11:59 AM IST
1/12

Actor Lee Sun Kyun Of Oscar Winning Movie Found Dead In A Car

दक्षिण कोरियामधील जगप्रसिद्ध अभिनेता ली सून क्यून याचं आज आकस्मिक निधन झालं आहे. ली सून क्यून केवळ 48 वर्षांचा होता. 

2/12

Actor Lee Sun Kyun Of Oscar Winning Movie Found Dead In A Car

ली सून क्यून हा त्याच्या कारमध्ये मृतावस्थेत आढळून आला. पॅरासाईट नावाच्या चित्रपटामधील भूमिकेमुळे जगभरामध्ये ली सून क्यून हा चर्चेत आला होता. 

3/12

Actor Lee Sun Kyun Of Oscar Winning Movie Found Dead In A Car

ली सून क्यून हा सियोल प्रांतातील सेओंगबुल जिल्ह्यात त्याच्या कारमध्ये मृतावस्थेत सापडला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. 

4/12

Actor Lee Sun Kyun Of Oscar Winning Movie Found Dead In A Car

कोरियामधील वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक पोलिसांनी ली सून क्यूनने आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली आहे. ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी ली सून क्यूनची चौकशी सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाल्याने आत्महत्येची शक्यता व्यक्त केली जात आहे.

5/12

Actor Lee Sun Kyun Of Oscar Winning Movie Found Dead In A Car

दक्षिण कोरियामधील अनेक वृत्तसंस्थांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ली सून क्यूनचा मृत्यू झाल्याचं वृत्त दिलं आहे. सध्या ली सून क्यूनची चौकशी सुरु होती. ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी सध्या तो चर्चेत होता.

6/12

Actor Lee Sun Kyun Of Oscar Winning Movie Found Dead In A Car

'सोम्पी'च्या वृत्तानुसार, पोलिसांना एका महिलेचा फोन आला. आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी म्हणजेच सुसाईड नोट लिहून माझे पती घर सोडून निघून गेले आहेत असं या महिलेनं सांगितलं. नंतर ही घर सोडून गेलेली व्यक्ती ली सून क्यून असल्याचं स्पष्ट झालं.  

7/12

Actor Lee Sun Kyun Of Oscar Winning Movie Found Dead In A Car

पोलिसांनी मृत व्यक्ती ही ली सून क्यूनच असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ली सून क्यूनच्या कारमध्ये चारलोक ब्रिक्स म्हणजेच कोळश्याची राख सापडली आहे. यावरुन त्याने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे.

8/12

Actor Lee Sun Kyun Of Oscar Winning Movie Found Dead In A Car

मुद्दाम अंमली पदार्थांचं सेवन केल्याचा आरोप ली सून क्यूनवर होता. मात्र हा आरोप त्याने फेटाळल्याचं वृत्त समोर आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. 

9/12

Actor Lee Sun Kyun Of Oscar Winning Movie Found Dead In A Car

मागील अनेक वर्षांपासून दक्षिण कोरियामधील मनोरंजन सृष्टीमधील महत्त्वाचं नाव असलेला ली सून क्यून चुकीच्या कारणांसाठी मागील काही काळापासून चर्चा होता. अंमली पदार्थांच्या सेवन प्रकरणी त्याची चौकशी सुरु होती. 

10/12

Actor Lee Sun Kyun Of Oscar Winning Movie Found Dead In A Car

ली सून क्यूनने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्यापैकी पॅरासाईट हा प्रमुख चित्रपट होता. या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारही मिळाला होता.

11/12

Actor Lee Sun Kyun Of Oscar Winning Movie Found Dead In A Car

ली सून क्यूनने 'माय मास्टर', 'कॉफी प्रिन्स', 'माय स्वीट सियोल', 'मिस कोरिया' आणि 'अ हार्ड डे' चित्रपटांमध्येही काम केलं होतं.

12/12

Actor Lee Sun Kyun Of Oscar Winning Movie Found Dead In A Car

ली सून क्यूनच्या आकस्मिक मृत्यूने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.