'त्या बिचाऱ्याचं अनेक वर्षांपूर्वी...', अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नाबद्दलच्या 'त्या' प्रश्नावर राणी मुखर्जी बेधडक बोलली

Rani Mukerji React On Abhishek Aishwarya Wedding: राणी मुखर्जीचा जीव अभिषेक बच्चनवर जडला होता. तिचं अभिषेकवर प्रेम असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या. मात्र या दोघांचं नातं फिस्कटण्यासाठी कारणीभूत ठरल्या त्या जया बच्चन. अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाला अनेकांना आमंत्रण होतं मात्र त्यात राणी मुखर्जीचा समावेश नव्हता. याबद्दल राणीनेच प्रतिक्रिया नोंदवलेली. ती काय म्हणालेली पाहूयात...

| Nov 09, 2024, 13:30 PM IST
1/13

raniabhiash

नुकताच पार पडलेला 'आयफा' पुरस्कार सोहळा आणि अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायदरम्यानचे कथित मतभेदांमुळे राणी मुखर्जीचं हे विधान चर्चेत आल्याचं दिसत आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात...

2/13

raniabhiash

अभिनेत्री राणी मुखर्जीला यंदाच्या फिल्म फेअरमध्ये पुरस्कार मिळाल्याने ती चर्चेत आहे. 

3/13

raniabhiash

तर दुसरीकडे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे दोघेही त्यांच्यातील कथित दुराव्यामुळे चर्चेत आहेत. असं असतानाच आता या तिघांचा एक जुना किस्साही चर्चेत आल्याचं पाहायला मिळत आहे.

4/13

raniabhiash

खरं तर अभिषेक बच्चनबरोबर राणी मुखर्जीने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यामध्ये 'बंटी और बबली', 'युवा', 'कभी अलविदा ना केहना' या सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. मात्र असं असतानाही राणीला अभिषेकने स्वत:च्या लग्नाला बोलावलं नव्हतं.

5/13

raniabhiash

याबद्दल राणीला त्यावेळी 'फिल्मफेअर'च्या मुलाखतीत विचारण्यात आलं असता तिथे फारच खोचक शब्दांमध्ये याचं उत्तर दिलं होतं. विशेष म्हणजे उत्तर देताना तिने अभिषेक बच्चनचाही उल्लेख केला होता. 

6/13

raniabhiash

"यावर अभिषेकच अधिक प्रकाश टाकू शकेल असं मला वाटतं. सत्य तर हे आहे की जर एखादी व्यक्ती तुम्हाला त्याच्या लग्नाला बोलवत नसेल तर त्याच्या आयुष्यात तुमचं स्थान काय आहे हे अधोरेखित होतं," असं राणी म्हणाली होती.

7/13

raniabhiash

"तुम्हाला वाटतं असेल की तुम्ही मित्र आहात. मात्र ही मैत्री केवळ सेटवर सहकलाकार आहोत इतक्या पुरतीच मर्यादीत असू शकते. याचा फारसा फरक पडत नाही. मात्र यामधून एक स्पष्ट झालं आहे की आम्ही केवळ सहकालकार होतो. मित्र नाही," असं राणीने म्हटलं होतं.

8/13

raniabhiash

"लग्नाचं आमंत्रण देणे अथवा न देणे हा खासगी निर्णय असतो. मी जेव्हा लग्नाचा विचार करेन तेव्हा मी मोजक्या लोकांना आमंत्रित करेल," असं राणीने त्यावेळी म्हटलं होतं. 

9/13

raniabhiash

"या साऱ्या प्रकाराला गरजेपेक्षा अधिक महत्त्व दिलं जात आहे," असंही राणीने अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नाला आमंत्रण आल्यासंदर्भात म्हटलं होतं.  

10/13

raniabhiash

अभिषेकच्या लग्नानंतर अनेक वर्षांनी हा प्रश्न विचारण्यात आल्याने या प्रश्नाला उत्तर देताना राणी मुखर्जीने, "त्या बिचाऱ्याचं अनेक वर्षांपूर्वी लग्न झालं आहे. आपण साऱ्यांनी आता मुव्ह ऑन झालं पाहिजे. त्याच्याबरोबर काम केल्याच्या चांगल्या आठवणी कायम माझ्या सोबत राहतील," असं विधान केलेलं.  

11/13

raniabhiash

दरम्यान, राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांचं लग्न होणार होतं अशा बातम्याही काही प्रसार माध्यमांनी त्यावेळेस दिल्या होत्या. राणी मुखर्जीच अभिषेकच्या प्रेमात पडल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. 

12/13

raniabhiash

मात्र राणी मुखर्जीला अभिषेकच्या पालकांचा सून म्हणून विरोध होता. खास करुन जया बच्चन यांना अभिषेक आणि राणीचं हे कथित नातं पसंत पडलं नव्हतं. म्हणूनच या दोघांचं नातं टीकलं नाही अशी चर्चा त्यावेळी मनोरंजनसृष्टीत होती.

13/13

raniabhiash

अभिषेक आणि ऐश्वर्याने 20 एप्रिल 2007 रोजी लग्न केलं. तर राणी मुखर्जीने प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य चोप्रांबरोबर 21 एप्रिल 2014 रोजी लग्नगाठ बांधली.