....अन् श्रद्धा कपूरने सेटवरुन थेट आईलाच लावला फोन; चित्रपटाच्या सेटवर असं काय घडलं होतं?

अभिनेत्री श्रद्धा कपूरने एका मुलाखतीत स्वत:शी संबंधित एक रहस्य उघड केले आहे. ज्यामुळे तिचे चाहते आश्चर्यचकित झाले होते. शूटिंगदरम्यान सेटवर तिच्यासोबत असं काय घडलं होतं? जाणून घ्या सविस्तर

| Oct 15, 2024, 18:26 PM IST
1/7

श्रद्धा कपूर

अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या 'स्त्री 2' चित्रपटाच्या भव्य यशाचा आनंद साजरा करत आहे. तिच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 800 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 

2/7

'स्त्री 2'

15 ऑगस्ट रोजी  'स्त्री 2' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना हे कलाकार होते. 

3/7

पहिला चित्रपट

श्रद्धा कपूरला चित्रपटसृष्टीत येऊन 14 वर्षे झाली आहेत. तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2013 मध्ये तिला 'आशिकी 2' चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली आहे. 

4/7

पहिल्या चित्रपटादरम्यान त्रास

अभिनेत्रीने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. ती म्हणाली की, पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिला खूप अडचणींचा सामना करावा लागला होता. 

5/7

थेट आईला सांगितले

अभिनेत्रीने एका मुलाखतीत म्हटलं आहे की, शूटिंगच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ती खूप अस्वस्थ झाली आणि तिने आईला सांगितले की, तिला हे जग समजत नसल्याने तिला पुन्हा सेटवर जायचं नाही. त्यावेळी ती 20-21 वर्षांची होती. 

6/7

कठीण प्रसंग

अभिनेत्रीने याआधी कोणत्याही चित्रपटाच्या सेटवर सहदिग्दर्शक म्हणून काम केले नव्हते. तिने सेटवर ज्या कठीण प्रसंगांना तोंड दिले ते श्रद्धाला अजूनही आठवते. 

7/7

वागणूक

जर तुम्ही मोठी व्यक्ती असाल तर तुमच्याशी वेगळ्या पद्धतीने बोलले जाईल. जर तुम्ही काही खास नसाल तर तुमच्याशी सामान्य वागणूक दिली जाईल.