सोनालीचा साखरपुडा झाला होssss

May 18, 2020, 21:22 PM IST
1/5

सौंदर्य, नृत्यकौशल्य आणि अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनं तिच्या आयुष्यातील अत्यंत खास अशा वळयणाची माहिती चाहत्यांना दिली आहे. 

2/5

वैयक्तिक आयुष्यात आलेलं हे वळण म्हणजे सोनालीचा साखरपुडा. बसला ना तुम्हालाही आश्चर्याचा धक्का? 

3/5

आपल्या वाढदिवसाच्याच दिवशी अनोख्या अंदाजात, हा दिवस संपण्यापूर्वी तिनं या खास क्षणांचे फोटो पोस्ट केले. ज्यानंतर अनेकांनीच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली.  

4/5

'आमचा ०२.०२.२०२० ला साखरपुडा झाला, आणि आमचा हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्या पेक्षा योग्य दिवस असूच शकत नाही असं मला वाटतं... आपले शुभाशीर्वाद कायम पाठीशी असू द्या...', अशा कॅप्शनसह तिनं हे फोटो पोस्ट केले. 

5/5

कुणाल बेनोडेकर असं सोनालीच्या जीवनातील या खास व्यक्तिचं, तिच्या पतीचं नाव आहे. साखरपुडा करत एका नव्या प्रवासाची सुरुवात करणारी ही जोडी आता कधी एकदा लग्नाची आनंदवार्ता सर्वांच्या भेटीला आणते याचीच उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. (सर्व छायाचित्रे- सोनाली कुलकर्णी/ इन्स्टाग्राम)