अभिनेत्रीचा हरवलेला मोबाईल मुंबई पोलिसांनी 2 तासात शोधला; मुंबईकरांची सटकली! म्हणे, 'ही सेवा...'
Mumbai Police Found Actress Lost Phone In 2 Hours: सामान्यपणे एखदा का मोबाईल फोनसारखी गोष्ट हरवली की ती पुन्हा सापडणं फार कठीण असतं. त्यातही लोकल ट्रेन किंवा मुंबईच्या गर्दीत फोन हरवल्यास तो गेल्यात जमा आहे असं मानलं जातं. मात्र एका अभिनेत्रीला तिचा हरवलेला फोन मुंबई पोलिसांनी शोधून दिल्यानंतर मुंबईकरांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या हरवलेल्या फोनसंदर्भातील अभिनेत्रीच्या पोस्टवर मुंबईकरांचं काय म्हणणं आहे पाहूयात...
1/9
2/9
3/9
4/9
5/9
"धन्यवाद, वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय मराठे सर, सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय आचरेकर सर, पोलीस हवालदार रवी गायकवाड, पोलीस हवालदार सांगपाल लहानेंचे मी आभार व्यक्त करते. त्यांनी तातडीने कारवाई करत अवघ्या 2 तासांमध्ये माझा हरवलेला फोन शोधून दिला. मुंबई पोलीस सर्वोत्तम आहेत," अशी पोस्ट प्रीति झंगियानीने लिहिली आहे.
7/9
मात्र अनेकांनी प्रीति झंगियानी अभिनेत्री असल्याने पोलिसांनी एवढ्या तातडीने कारवाई केल्याचं म्हटलं आहे. काहींनी त्यांची बाईक आठ वर्षांपासून हरवल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी केवळ व्हीआयपी असल्याने तिला अशी खास ट्रीटमेंट मिळाल्याचं म्हटलंय. एकाने 'ही अशी सेवा फक्त व्हीआयपी लोकांसाठी असते,' असं म्हटलं आहे.
8/9
9/9