मुमताज ते नम्रता शिरोडकर 'या' अभिनेत्रींनी लग्नानंतर केला चित्रपटसृष्टीला रामराम!

60 ते 70 च्या दशकात आपल्या सुंदरतेनं आणि अभिनयानं सगळ्यांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे मुमताज. मुमताज यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शम्मी कपूर यांच्यावर खूप प्रेम असताना देखील लग्न केलं नाही याविषयी सांगितलं आहे. त्याचं कारण होतं शम्मी कपूर यांची एक अट त्यांनी सांगितलं होतं की लग्नानंतर कपूर कुटुंबातील महिला काम करत नाहीत. ही अट त्यांना मान्य नव्हती त्यामुळे त्यांचं लग्न झालं नाही. त्यानंतर त्यांनी 1974 मध्ये मयूर माधवानी यांच्याशी लग्न केलं आणि लंडनमध्ये सेटल झाल्या. चला तर जाणून घेऊया अशाच आणखी अभिनेत्रींविषयी.... 

| Feb 26, 2024, 19:03 PM IST
1/8

असिन

असिनला गजनी या चित्रपटामुळे लोकप्रियता मिळाली. त्याआधी तिचे दाक्षिणात्य चित्रपटात लाखो चाहते होते. मात्र, माइक्रोमॅक्सच्या सीईओशी लग्न केल्यानंतर तिनं स्वत: ला चित्रपटसृष्टीपासून लांब केलं. 

2/8

नरगिस दत्त

नरगिसत दत्त यांना मदर इंडिया हा चित्रपट आजही अनेकांच्या लक्षात आहे. 1958 मध्ये सुनील दत्त यांच्याशी लग्न केल्यानंतर त्या अभिनय क्षेत्रापासून लांब गेल्या. 

3/8

नम्रता शिरोडकर

माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकरनं 2005 मध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूशी लग्न केलं. त्यानंतर तिनं अभिनय क्षेत्रातून काढता पाय घेतला आणि बिझनेसवूमन झाली.   

4/8

सायरा बानो

सायरा बानो यांनी वयानं 22 वर्षे मोठ्या असलेल्या दिलीप कुमार यांच्याशी लग्न केल्यानंतर चित्रपटसृष्टीपासून अंतर ठेवलं. 

5/8

बबिता

करीना कपूर आणि करिश्मा कपूरच्या आई असलेल्या बबिता या अभिनेत्री होत्या. 1971 मध्ये त्यांनी रणधीर कपूर यांच्याशी लग्न केलं आणि त्यानंतर त्या चित्रपटांमध्ये दिसल्या नाही. 

6/8

मीनाक्षी शेषाद्रि

मीनाक्षी शेषाद्रिनं 1995 मध्ये इन्वेस्टमेंट बॅंकर हरीश मैसूरशी लग्न केलं. त्यानंतर चित्रपटसृष्टीपासून लांब जात त्या यूएसमध्ये सेटल झाल्या.   

7/8

मंदाकिनी

'राम तेरी गंगा मैली' चित्रपटातून सगळ्यांची मने जिंकणाऱ्या मंदाकिनी यांनी 1990 मध्ये लग्न केलं त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीपासून काढता पाय घेतला. त्यांच्या लग्नानंतर देखील त्यांचे चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र, त्यानंतर अचानक त्या ग्लॅमरच्या जगातून दूर झाल्या. 

8/8