Adipurush मुळे चर्चेत आलेलं जपानच्या Yugo Sako यांचं 'रामायण' आजही का आहे एवढं खास? जाणून घ्या

Adipurush Vs Ramayana The Legend of Prince Rama : सध्या चर्चेत असणारं नाव म्हणजे 'आदिपुरुष' आणि आणखी एक नाव म्हणजे  गेल्या कैक वर्षात प्रकाशझोतात असणारं, या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा पाहिलं आणि Search केलं जाणारं Ramayana The Legend of Prince Rama

Jun 22, 2023, 10:39 AM IST

Adipurush Vs Ramayana The Legend of Prince Rama : रामायण... एक असं महाकाव्य ज्यामाध्यमातून भारतीय संस्कृती आणि पौराणिक कथांची एक अनोखी बाजू संपूर्ण जगानं पाहिली. या महाकाव्यानं अनेक कलाकारांना प्रेरणा दिली आणि त्यातून याच रामायणाची बहुविध रुपं कलेच्या माध्यमातून सर्वांना पाहता आली. 

1/7

Ramayana The Legend of Prince Rama

adipurush getting tough competition from 1992 film Ramayana The Legend of Prince Rama

Adipurush Vs Ramayana The Legend of Prince Rama : तब्बल 600 कोटी रुपयांचा निर्मिती खर्च असूनही सध्या पुन्हा एकदा प्रेक्षांना भुरळ पाडतंय ते म्हणजे Ramayana The Legend of Prince Rama. या अॅनिमेटेड चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं  युगो साको (Yugo Sako), कोइची सासाकी (Koichi Sasaki) आणि भारतातील राम मोहन (Ram Mohan) यांनी. 

2/7

रामायणाचा प्रभाव

adipurush getting tough competition from 1992 film Ramayana The Legend of Prince Rama

Scroll मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार साको एका चित्रपटाच्या निमित्तानं भारतात आले असता त्यांना रामायण या महाकाव्याची माहिती मिळाली आणि ते प्रभावित झाले. या महाकाव्यात मनुष्य, प्राणी, पक्षी, युद्ध सर्वकाही असल्यामुळं त्यांनी लगेचच रामायणाचं जपान भाषांतर वाचलं आणि अशी एखादी गोष्ट मांडण्यासाठी अॅनिमेशन हा उत्तम पर्याय असल्याचं मत मांडलं.   

3/7

भारतीय- जपानी कलाकारांचे प्रयत्न

adipurush getting tough competition from 1992 film Ramayana The Legend of Prince Rama

भारतीय आणि जपानी कलाकारांसोबतच ही 'द लेजेंड ऑफ प्रिन्स राम' दोन्ही देशांच्या सरकारच्या संयुक्त विद्यमानं तयार होणारी कलाकृती होती. परिणामी भारताच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाकडून 'पंचतंत्र'वर आधारित चित्रपट तयार करण्याची विचारणा करण्यात आली. पण, साको यांच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. 

4/7

आव्हानंचा डोंगर

adipurush getting tough competition from 1992 film Ramayana The Legend of Prince Rama

तो काळ असा होता जेव्हा मोबाईल, ईमेलचं तंत्रज्ञान पूर्णपणे विसतिक नव्हतं. परिणामी कुरियरच्या माध्यमातून कथा, संवादांची चर्चा झाली. यामध्ये अडथळे आणि आव्हानंही तितकीच आली. 

5/7

कलाकारांची मेहनत

adipurush getting tough competition from 1992 film Ramayana The Legend of Prince Rama

जवळपास 450 कलाकारांच्या अथक परिश्रमांनंतर चित्रपटाचं अॅनिमेशन पूर्ण झालं आणि 800 मिलियन येन म्हणजेच आजचे 46.3 कोटी रुपयांमध्ये ही कलाकृती साकारण्यात आली.   

6/7

लोकप्रियतेचं शिखर गाठलं

adipurush getting tough competition from 1992 film Ramayana The Legend of Prince Rama

1993 मध्ये हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला. त्यावेळी बाबरी मशिदीचा मुद्दा चर्चेत असल्यानं या कलाकृतीलाही प्रचंड लोकप्रियता मिळाली. 90 च्या दशकापासून अनेकांच्याच आवडत्या चित्रपटांमध्ये Ramayana The Legend of Prince Rama अग्रस्थानी होती आणि आजही आहे. 

7/7

'जननी हम राम दूत हनुमान'

adipurush getting tough competition from 1992 film Ramayana The Legend of Prince Rama

'जननी हम राम दूत हनुमान' हे आणि असे संवाद या चित्रपटाला आणखी खास बनवू गेले. तर, भारतीय कलाकारांच्या आवाजात ध्वनिमुद्रीत केल्यामुळं यातलं प्रत्येक पात्र सानथोरांना आपलंसं वाटलं. 'आदिपुरुष' मात्र या बाबतीत सपशेल अपयशी ठरला असंच म्हणावं लागेल.