ऐश्वर्या - अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चेमध्ये ननंद श्वेताचा खुलासा, 'ती व्हॉट्सअॅप ग्रुपवर...'

Aishwarya Rai - Abhishek Bachchan  : बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध कुटुंब बच्चन घराण्यात काही आलबेल नाही अशी चर्चा रंगली आहे. ऐश्वर्या बच्चन आणि अभिषेक बच्चनचा घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. 

Dec 05, 2023, 18:06 PM IST
1/8

गेल्या काही काळापासून बच्चन कुटुंब चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या राय बच्चनचा वाढदिवस झाला. त्यावेळी वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये बच्चन कुटुंबातील एकही सदस्य दिसले नव्हते.   

2/8

अगदी अभिषेक बच्चनने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करुन फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.  

3/8

अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये बिनसलं असून ते लवकरच वेगळे होणार आहे, अशी चर्चा रंगली आहे. या बातमीत किती तथ्य आहे जे अजून स्पष्ट झालं नाही. 

4/8

नुकतच अमिताभ बच्चन यांनी श्वेता बच्चन हिच्या नावावर जुहूमधील प्रतीक्षा बंगला गिफ्ट केला. त्यानंतर अभिषेक बच्चनच्या बोटातील साखरपुड्याची अंगठी नसणारा फोटो व्हायरल झाला. त्यामुळे सोशल मीडियावर खळबळ माजली आहे.   

5/8

अशातच ऐश्वर्या राय बच्चनची नंनद श्वेता नंदा बच्चन हिने ऐश्वर्याबद्दल एक खुलासा केला आहे. बच्चन कुटुंबियांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर ऐश्वर्या राय कशी वागते त्याबद्दल सांगितलंय. 

6/8

श्वेताने सांगितलं की, व्हॉट्सअॅप ग्रुपवर अमिताभ बच्चन हे सर्वाधिक सक्रिय असतात. तर जया बच्चन या फक्त गूड मार्निंग आणि गूड नाईट म्हणतात. 

7/8

ऐश्वर्या ही ग्रुपवर कमी सक्रीय असते. त्याशिवाय ती ग्रुपवर वेळेवर उत्तर देत नाही, असं श्वेताने कॉफी विथ करणमध्ये सांगितलं होतं.   

8/8

अभिषेकने खुलासा केला की, त्याला ग्रुपमध्ये कडक नियम आहे. तो कुठे जाणार असेल तर त्याला ग्रुपमध्ये माहिती द्यावी लागते.