Ajay Devgn Relationship : काजोलआधी अजय देवगणनं 'या' अभिनेत्रींना केलंय डेट?

Ajay Devgn Relationship : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) आज 54 वा वाढदिवस आहे. अजयनं आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अजय त्याच्या अॅक्शनसाठी ओळखला जातो. सध्या त्याचा चर्चेत असणारा चित्रपट म्हणजे 'भोला'. 'भोला' (Bholaa) रामनवमीनीच्या निमित्तानं प्रदर्शित झाला होता. अजयनं फक्त अनेक चित्रपटांमध्येच काम केलेलं नाही तर अनेक अभिनेत्रींसोबत देखील काम केलं आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्तानं आपण त्याचं नाव कोणत्या कोणत्या अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं ते जाणून घेऊया...   

Apr 02, 2023, 15:46 PM IST
1/6

Ajay Devgn Relationship

अजयनं त्याच्या करिअरची सुरुवात केल्यापासून तो चर्चेत आहे. अजयच्या डेटिंग लिस्टमध्ये सगळ्यात आधी अभिनेत्री रवीना टंडनचं नावं आहे. रिपोर्ट्सनुसार, 'दिलवाले' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, अजय आणि रवीना जवळ आले होते. त्यानंतर त्या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. पण काही कारणांमुळे त्यांचा ब्रेकअप झाला. (Photo Credit : Pinterest)   

2/6

Ajay Devgn Relationship

रवीनानंतर अजय हा करिश्मा कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होता असं म्हटलं जात आहे. पण त्यांनी या अफवा असल्याचे म्हटले होते. (Photo Credit : A Still form Jigar)   

3/6

Ajay Devgn Relationship

लोकप्रिय अभिनेत्री मनीषा कोइरालाचे नाव देखील अजय देवगणशी जोडण्यात आले होते. रिपोर्ट्सनुसार 'धनवान' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, ते दोघं जवळ आले होते. (Photo Credit : Ek Hi Ghosla Song Youtube)  

4/6

Ajay Devgn Relationship

या तिघींशिवाय अजय देवगणचं नाव तब्बूशी जोडण्यात आलं होतं. पण त्या दोघांनी कधीच त्यावर वक्तव्य केलं नाही. तर तब्बूनं एका मुलाखतीत अजयमुळे मी सिंगल आहे असं सांगितलं होतं. ( Photo Credit – A Still From De De Pyaar De )

5/6

Ajay Devgn Relationship

1999 साली अजयनं अभिनेत्री काजोलसोबत सप्तपदी घेतल्या होत्या. (Photo Credit : Kajol Instagram) 

6/6

Ajay Devgn Relationship

अजय आणि काजोलला दोन मुलं असून एक मुलगी आणि मुलगा आहे. मुलीचं नाव न्यासा आहे तर मुलाचं नाव युग असं आहे. (Photo Credit : Ajay Devgn Instagram)