IPL 2024 : मुंबई इंडियन्स सोडल्यावर रोहित कोणत्या संघात जाणार? अंबाती रायडू म्हणतो...

Ambati Rayudu On Rohit Sharma : मुंबई इंडियन्सच्या निर्णयावर रोहित शर्मा नाराज आहे, अशा चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहेत. 

| Apr 10, 2024, 17:39 PM IST

Ambati Rayudu Critisized mumbai indians : रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार असल्याचं देखील बोललं जातंय. अशातच अंबाती रायडूने मोठं वक्तव्य केलंय.

1/7

कारकीर्दीच्या शिखरावर

रोहित शर्मा त्याच्या क्रिकेट कारकीर्दीच्या शिखरावर आहे. आक्रमक फलंदाजी आणि मैदानावरील कर्णधारपदाच्या निर्णयांमुळे चाहते त्याच्यावर प्रेम आजही करतात. 

2/7

मुंबई इंडियन्स

रोहितच्या कॅप्टन्सीमुळे वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला फायनल गाठता आली असली तरी रोहितला मुंबई इंडियन्सने नारळ दिला.

3/7

दिग्गज क्रिकेटपटू

अशातच अनेक दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्मा इतर फ्रँचायझीकडे जाण्याच्या शक्यतेवर चर्चा करत आहेत. त्यामुळे आता रोहितच्या निर्णयावर अनेकांचं लक्ष लागलंय.

4/7

अंबाती रायडू

अशातच रोहित कोणत्या संघात जाईल? असा सवाल जेव्हा अंबाती रायडूला विचारण्यात आला. तेव्हा त्यांने स्पष्ट उत्तर दिलं.

5/7

कॅप्टन

शेवटी हा रोहित शर्माचा निर्णय असेल त्याला कोणत्या संघात जायचंय. मात्र, प्रत्येक संघाला त्याला आपल्या टीमचा कॅप्टन करायला आवडेल, असंही रायडू म्हणाला आहे.

6/7

मुंबई इंडियन्सला टोला

त्यावेळी बोलताना रायडूने मुंबई इंडियन्सला टोला देखील लगावला होता. तो ज्या संघात जाईल तेव्हा कमीतकमी त्याला आत्तासारखी वागणूक तरी मिळणार नाही, असं अंबाती रायडूने म्हटलं आहे.

7/7

चेन्नईचा कर्णधार

हिटमॅन पुढची आणखी 5 ते 6 वर्ष आयपीएल खेळू शकतो. धोनीनंतर चेन्नईचा कर्णधार म्हणून रोहित शर्मा सर्वोत्तम उमेदवार असल्याचं वक्तव्य अंबातीने काही दिवसांपूर्वी केलं होतं.