Amitabh Bachchan - Rekha : अमिताभ यांनी शेअर केला रेखासोबतचा 'तो' फोटो अन् म्हणाले की...

Amitabh Bachchan - Rekha : इतक्या वर्षांनंतर महानायक अमिताभ बच्चन यांनी रेखासोबतचा तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.   

Jan 23, 2024, 10:13 AM IST
1/8

अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर सक्रिय असून ते अनेक वेळा जुने फोटो आणि त्यासोबतच्या आठवणी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. 

2/8

काही फोटो हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील असतात तर काही त्यांच्या बॉलिवूडमधील प्रवासातील झलक असते.  

3/8

नुकताच अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर रेखासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. 

4/8

मीडिया रिपोर्टनुसार अमिताभ बच्चन आणि रेखाचं अफेयर होतं. ते अनेक वर्ष टिकलं पण जया बच्चन यांना कल्पना मिळाली आणि त्यांनी अगदी सहज या नात्याला कोणाला कल्पना न येऊ देता पूर्णविराम लावला. 

5/8

आज इतक्या वर्षांनंतर अमिताभ बच्चन यांनी रेखासोबतचा फोटो शेअर केल्यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

6/8

विशेष म्हणजे बीग बी यांनी हा फोटो शेअर करताना एक कॅप्शन पण दिलं आहे. ज्यात त्यांनी लिहिलं आहे की, 'या फोटोमागे एक मोठी कथा आहे. कधीतरी ती सांगेन.'

7/8

या फोटोमध्ये अमिताभ बच्चन आणि रेखासोबत राज कपूर, रणधीर कपूर, विनोद खन्ना, मेहमूद, शम्मी कपूर दिसत आहेत. 

8/8

रेखा आणि बीग बी यांनी दो अंजाने, सिलसिला, मिस्टर नटवरवाला, सुहाग या चित्रपटांमध्ये काम केलं. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x