इरफान खानचा 'ब्लॅकमेल' पाहून बिग बी अमिताभ बच्चन झाले फिदा

Apr 02, 2018, 21:29 PM IST
1/5

बॉलिवूडचा अभिनेता इरफान खान याचा 'ब्लॅकमेल' सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग पाहून बॉलिवूडचे शहेनशहा अर्थात बिग बी अमिताभ बच्चन चांगलेच आनंदी झाले आहेत. त्यांनी आपली प्रतिक्रिया ट्विटरवर व्यक्त केली आहे.

2/5

अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत म्हटलं, "आज एक दमदार 'ब्लॅकमेल' हा सिनेमा पाहिला, एक उत्कृष्ठ पटकथा, चांगली गोष्ट, चांगला अभिनय, उत्‍कृष्‍ट सादरीकरण अशी कला पाहून खूपच आनंद झाला".  

3/5

मार्च महिन्यात इरफान खानने खुलासा केला होता की, न्यूरो इंडोक्राईन ट्यूमर आजाराने त्रस्त आहे आणि त्यावर उपचार करण्‍यासाठी परदेशात आहे.  

4/5

'ब्लॅकमेल' हा सिनेमा अशा एका व्यक्तीच्या आयुष्यावर आहे जो दिवसभर नोकरीत बीझी राहतो आणि बोअरिंग आयुष्य जगत असतो. मात्र, त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचं त्याला ज्यावेळी कळत त्यानंतर त्याच्या आयुष्यात खूप मोठे बदल होतात.

5/5

अभिनय देव दिग्दर्शित 'ब्लॅकमेल' या सिनेमात कृती कुलहरी, दिव्या दत्ता, अरुणोदय सिंह, ओमी वैद्य आणि अनुजा साठे या कलाकारांनी भूमिका केली आहे. 'ब्लॅकमेल' हा सिनेमा ६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.