सोनमच्या पतीला दुर्धर आजार! 'आयुष्य नर्क' असा उल्लेख करत म्हणाली, 'सत्तेतले लोक राक्षसासारखे..'

Anil Kapoor daughter Sonam Kapoor On husband Anand Ahuja rare disease: बॉलीवूडमधील सेलिब्रिटींनी 2024 चं मोठ्या दणक्यात स्वागत केलं आहे. मागील वर्ष अनेक कलाकारांसाठी अविस्मरणीय ठरलं तर काहींना खासगी आयुष्यातील संकटांना तोंड द्यावं लागलं. अनिल कपूर यांची लेक सोनम कपूरलाही मागील वर्ष फारसं खास गेलं नाही. सोनमचा नवरा आनंद आहूजाला एका गंभीर आजाराची लागण झाली आहे. त्याला झालेल्या आजाराचं निदान डॉक्टरांनाही करता आलेलं नाही. यासंदर्भात सोनमने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. ती काय म्हणाली आहे पाहूयात...

Jan 04, 2024, 09:34 AM IST
1/11

Anil Kapoor daughter Sonam Kapoor On husband Anand Ahuja rare disease

सोनम कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनमचा पती आनंद अहूजा, मुलगा वायू आणि कुटुंबातील इतर लोकं दिसत आहेत. या व्हिडीओला सोनमने एक लांबलचक कॅप्शन दिली आहे. यामध्ये तिने आनंद अहूजाला झालेल्या गंभीर आजाराची माहिती दिली आहे.

2/11

Anil Kapoor daughter Sonam Kapoor On husband Anand Ahuja rare disease

"मागील वर्ष माझ्यासाठी रोलर कोस्टर राइडसारखं होतं. आम्ही पालक आहोत हे आम्ही स्वीकारलं आणि या आनंदाबरोबरच सतत एक भीतीही मनात असायची. मी भावनिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या, अध्यात्मिक दृष्ट्या फार बदलले आहे याची मला जाणीव झाली. हे सारं काही दु:ख, घडलेले बदल स्वीकारणे यामुळे झालं," असं सोनम म्हणाली आहे.

3/11

Anil Kapoor daughter Sonam Kapoor On husband Anand Ahuja rare disease

सोनमने तिच्या पतीच्या आजाराबद्दलही लिहिलं आहे. "माझा नवरा फार आजाराही होती. कोणत्याही डॉक्टरांना समजत नव्हतं की त्याला नेमकं झालंय काय. नंतर या आजाराचं निदान झालं," असं सोनम म्हणाली.

4/11

Anil Kapoor daughter Sonam Kapoor On husband Anand Ahuja rare disease

"तो पूर्णपणे यातून बरा झाला. ते 3 महिने नर्कात असल्यासारखे होते. मी देवाचे आणि डॉ. सरीनचे आभार मानू इच्छिते," असंही सोनम म्हणाली आहे.

5/11

Anil Kapoor daughter Sonam Kapoor On husband Anand Ahuja rare disease

"नवीन सुरुवात केली आहे. पतीच्या कामामध्ये त्याला पाठिंबा देत पुन्हा आपलं काम सुरु केलं आहे. कुटुंब आणि मित्रपरिवाराबरोबर अधिक वेळ घालवण्याबरोबरच हे वर्ष कठीण, सुख दु:खांनी भरलेलं आणि समृद्ध करणारं होतं," असं सोनमने नमूद केलं आहे.

6/11

Anil Kapoor daughter Sonam Kapoor On husband Anand Ahuja rare disease

"मला अपेक्षा आहे की हे येणारं 2024 चं वर्ष ही विकासाबरोबरच चढ उतार असलेलं असलं तरी ते नवीन धडे गिरवायला शिकवले," असं सोनमने म्हटलं आहे.

7/11

Anil Kapoor daughter Sonam Kapoor On husband Anand Ahuja rare disease

"युद्धाने काहीही होत नाही हे जगाला समजेल अशी अपेक्षा मला या वर्षाकडून आहे. एका चुकीच्या युद्धात ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांसाठी मी प्रार्थना करते," असंही सोनमने म्हटलं आहे.

8/11

Anil Kapoor daughter Sonam Kapoor On husband Anand Ahuja rare disease

"सध्या फार चुकीच्या पद्धतीने आणि भयानक युद्ध होत आहे. यामध्ये केवळ सामान्य नागरिक आणि लहान मुलांना त्रास सहन करावा लागतोय. मात्र सत्तेत बसलेले लोक राक्षसासारखे वागत आहेत," असं सोनमने म्हटलं आहे. 

9/11

Anil Kapoor daughter Sonam Kapoor On husband Anand Ahuja rare disease

"नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मी जगामध्ये शांतता नांदावी अशी इच्छा व्यक्त करते. आयुष्याने मला जे काही दिलं आहे त्यासाठी मी समाधानी आहे. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. सर्वांना माझे प्रेम," असेही पोस्टच्या शेवटी सोनमने म्हटलं आहे.

10/11

Anil Kapoor daughter Sonam Kapoor On husband Anand Ahuja rare disease

सोनमच्या या लांबलचक पोस्टवर तिचा पती आनंद आहूजाने रिप्लाय केला आहे. "तू सर्वात सुंदर, दयाळू, काळजी घेणारी आहेस. तू तुझा वेळ, ऊर्जा आणि प्रयत्नांचा वापर चांगल्या कामासाठी करत आहेस," असं म्हणत आनंद आहूजाने सोनमचं कौतुक केलं आहे.

11/11

Anil Kapoor daughter Sonam Kapoor On husband Anand Ahuja rare disease

"तू स्वत:ला आणि कुटुंबाला देणारा वेळ फार उत्तमरित्या मॅनेज करत आहेस. 2024 मध्येही तू असं करत राहशील अशी अपेक्षा आहे," असं आनंद आहूजाने सोनमला म्हटलं आहे.