श्रीदेवींच्या निधनानंतर बॉलिवूडकरांची अनिल कपूरच्या घरी धाव

Feb 26, 2018, 13:11 PM IST
1/8

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर अभिनेता अर्जुन कपूर शूटिंग रद्द करुन तात्काळ मुंबईत परतला. श्रीदेवी यांच्या दोन्ही मुली यावेळी अनिल कपूर यांच्या घरी आहेत आणि त्यामुळे अर्जुन कपूरही अनिल कपूर यांच्या घरी पोहोचला.

2/8

फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा सुद्धा श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजताच अनिल कपूर यांच्या घरी पोहोचला. ज्या लग्नसोहळ्यासाठी श्रीदेवी दुबईत गेल्या होत्या त्या सोहळ्यात मनीष मल्होत्राही उपस्थित होता.  

3/8

श्रीदेवी यांच्या निधनानंतर अभिनेत्री रेखाही अनिल कपूर यांच्या निवासस्थानी पोहोचली. श्रीदेवी यांच्या निधनाने सर्वांनाच एक धक्का बसला आहे.  

4/8

कोरिओग्राफर वैभवी मर्चंटही अनिल कपूर यांच्या घरी पोहोचली. शनिवारी रात्री दुबईत कार्डिअॅक अरेस्टने श्रीदेवी यांचं निधन झालं.  

5/8

करण जोहरला श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर करण जोहर जान्हवीच्या घरी पोहचला. त्यानंतर जान्हवीला काका अनिल कपूरच्या घरी नेलं. 'धडक' या सिनेमातून करण जोहर अभिनेत्री जान्हवी कपूरला बॉलिवूडमध्ये लॉन्च करत आहे.  

6/8

अभिनेत्री राणी मुखर्जीही अनिल कपूरच्या घरी दाखल झाली.  

7/8

संजय कपूरची पत्नी महीप कपूर आपली मुलगी शनायासोबत अनिल कपूरच्या घरी पोहोचली. 

8/8

श्रीदेवींसोबत अनेक सिनेमांत काम केलेले अभिनेते रजनीकांत हे सुद्धा अंत्यसंस्कारासाठी मुंबईत पोहोचले आहेत.(सर्व फोटो सौजन्य: बॉलिवूडलाइफ डॉट कॉम)