वयाच्या 50 व्या वर्षी अभिनेता चौथ्यांदा झाला बाबा; Photo Viral

Arjun Rampal Baby Boy : वयाच्या 50 व्या वर्षी बाबा होणाऱ्या या अभिनेत्याचं नाव आहे अर्जुन रामपाल. सध्या अर्जुनवर अनेकजण शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.   

Jul 21, 2023, 11:31 AM IST

हिंदी कलाजगतामध्ये दमदार अभिनय आणि काही निवडक भूमिकांमुळं प्रकाशझोतात आलेल्या एका अभिनेत्याच्या घरी पुन्हा एकदा आनंद एका नव्या रुपात आला आहे. कारण, हा अभिनेता पुन्हा एकदा बाबा झाला आहे. 

 

1/7

अर्जुन रामपाल पुन्हा एकदा बाबा ....

Arjun Rampal Girlfriend Gabriella welcome baby boy

अर्जुन रामपाल पुन्हा एकदा बाबा झाला असून, सध्या त्याच्यासह त्याच्या कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. प्रेयसी गॅब्रिएला डेमेट्रिएड्सनं पुन्हा एकदा एका मुलाला जन्म दिला असून, अर्जुननं सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोड बातमी चाहत्यांना सांगितली. 

2/7

हॅलो वर्ल्ड ....

Arjun Rampal Girlfriend Gabriella welcome baby boy

हॅलो वर्ल्ड असं लिहिलेला Pooh Bear चा टॉवेल असणारा एक फोटो त्यानं पोस्ट करत, बाळाच्या जन्माची माहिती दिली आणि आई- मुलाची प्रकृती उत्तम असल्याचंही स्पष्ट केलं.   

3/7

लिव्ह इन रिलेशनशिप

Arjun Rampal Girlfriend Gabriella welcome baby boy

अर्जुन आणि त्याची प्रेयसी गॅब्रिएला 2018 पासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांचं नातं आता सर्वज्ञात असून, तेव्हापासूनच ते दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. 

4/7

अर्जुन आणि गॅब्रिएला

Arjun Rampal Girlfriend Gabriella welcome baby boy

2019 मध्ये अर्जुन आणि गॅब्रिएलानं त्यांच्या या नात्यात पहिल्या बाळाचं स्वागत केलं. एरिक असं त्यांच्या मोठ्या मुलाचं नाव

5/7

अर्जुनचं लग्न मेहर जेसियासोबत झालं होतं.

Arjun Rampal Girlfriend Gabriella welcome baby boy

पहिल्या नात्याविषयी सांगावं तर, अर्जुनचं लग्न मेहर जेसियासोबत झालं होतं. या नात्यातून त्याला माहिका आणि मायरा अशा दोन मुलीही आहेत. 2019 मध्येच अर्जुननं पत्नीपासून अधिकृतपणे घटस्फोट घेत या नात्याला पूर्णविराम दिला होता. 

6/7

वैवाहिक नात्यातून बाहेर पडल्यानंतर....

Arjun Rampal Girlfriend Gabriella welcome baby boy

वैवाहिक नात्यातून बाहेर पडल्यानंतर अर्जुननं सर्वाधिक वेळ गॅब्रिएलासोबतच्या नात्याला दिला आणि सध्या तो या नात्यात एका नव्या भूमिकेत दिसतोय.   

7/7

सुरेख नातं

Arjun Rampal Girlfriend Gabriella welcome baby boy

दोन्ही मुलींचं त्याच्याशी आणि गॅब्रिएला, एरिकशीही सुरेख नातं असल्याचं वेळोवेळी पाहायला मिळतं. (छाया सौजन्य- अर्जुन रामपाल, गॅब्रिएला डेमेट्रिएड्सनं इन्स्टाग्राम)