३० वर्षानंतरही 'रामा'च्या भूमिकेत अरुण गोविल कायम

Jan 13, 2018, 16:27 PM IST
1/5

Arun Govil

Arun Govil

 अरुण गोविल याने 'रामायण'मध्ये 'रामा'ची भूमिका केली. त्यानंतर त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. अरुण हिंदी आणि टीव्ही मालिकांत काम करणारा अभिनेता अशी ओळख झाली. अरुणचा जन्म १२ जानेवारी १९५८ रोजी उत्तर प्रदेश मेरठ येथे झाला. त्याने प्राथमिक शिक्षण उत्तर प्रदेशमध्ये घेतले.अरुणने नोकरी करावी अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. मात्र, अरुणचे मन नोकरीत रमणारे नव्हते, त्यामुळे तो मुंबईत व्यवसाय करु लागला.    

2/5

Arun Govil

Arun Govil

'रामायण'मध्ये 'रामा'ची भूमिका करणाऱ्या अरुण गोविलने १७ वर्षी मुंबईत पाऊल ठेवले. त्याने आपल्या व्यवसाय सुरु केला. व्यवसायाबरोबर त्यांने अभिनय सुरु ठेवला. त्यानंतर त्याला ऑफर येऊ लागली. १९७७ मध्ये तारा बडजात्याच्या 'पहेली' या सिनेमात संधी मिळाली. ती त्याची ही पहिली फिल्म होती. 

3/5

Arun Govil

Arun Govil

'रामायण'मध्ये 'रामा'ची भूमिका करणाऱ्या अरुण गोविलने  `सावन को आने दो`, `सांच को आंच नहीं`, `इतनी सी बात`, `हिम्मतवाला`, `दिलवाला`, `हथकड़ी`, और `लव-कुश`  आदी सिनेमात काम केले आहे. त्यानंतर त्याला 'रामा'ची भूमिका करण्यासाठी ऑफर आली. त्याने ही भूमिका चांगली निभावली आणि त्याचे नाव अधिक प्रसिद्ध झाले. लोक त्याला 'राम' याच नावाने ओळखू लागले. त्याआधी त्याने विक्रम आणि बेताल या मालिकेत विक्रमादित्यची भूमिका साकारली. 

4/5

Arun Govil

Arun Govil

'रामायण'मध्ये 'रामा'ची भूमिका करणाऱ्या अरुण गोविलला दुसऱ्या भूमिकेत लोक पाहू शकत नव्हते. त्यामुळे अन्य भूमिका केल्या नसल्याचे अरुण नमूद करतो.

5/5

Arun Govil

Arun Govil

'रामायण'मध्ये काम करुन जवळपास ३० वर्ष झाली तरी 'रामा'ची भूमिका करणारा अभिनेता अरुण गोविल अजुनही 'रामा'च्या भूमिकेतून बाहेर पडलेला नाही. त्याने बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, तो त्यात अयशस्वी झाला. 'रामा'ची भूमिका केल्यानंतर अरुण गोविलला अनेक भूमिका मिळाल्यात. त्यामुळे अरुण जवळपास १० वर्षे सिनेमांपासून दूर राहिला. त्यानंतर 'रामायण'मध्ये  लक्ष्मणाची भूमिका करणारा सुनील लाहिडीसोबत त्यांने आपली प्रोडक्शन कंपनी सुरु केली. ( सर्व फोटो, सौजन्य - फेसबुक)  

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x