Rashi 2023: नव्या वर्षात गुरुचं या राशींना मिळणार पाठबळ, रखडलेली कामंही होतील पूर्ण

गुरू 24 नोव्हेंबरपासून मार्गस्थ झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या राशीच्या मीन राशीत उलट्या दिशेने फिरत होता. तथापि आता त्याच्या मार्गस्थ होण्यामुळे सर्व 12 राशींवर परिणाम होईल. अशा स्थितीत काही राशींवर देवगुरूची विशेष कृपा असणार आहे. त्याच्या कृपेने या राशीच्या लोकांच्या आयुष्यात खूप प्रगती होईल. या दरम्यान त्यांना मोठा फायदा होणार आहे. तेव्हा जाणून घेऊया या राशी कोणत्या?  

Dec 02, 2022, 18:07 PM IST

Lucky Rashi 2023: गुरू 24 नोव्हेंबरपासून मार्गस्थ झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या राशीच्या मीन राशीत उलट्या दिशेने फिरत होता. तथापि आता त्याच्या मार्गस्थ होण्यामुळे सर्व 12 राशींवर परिणाम होईल. अशा स्थितीत काही राशींवर देवगुरूची विशेष कृपा असणार आहे. त्याच्या कृपेने या राशीच्या लोकांच्या आयुष्यात खूप प्रगती होईल. या दरम्यान त्यांना मोठा फायदा होणार आहे. तेव्हा जाणून घेऊया या राशी कोणत्या?  

1/5

या राशीतल्या लोकांना आई-वडील आणि कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल

astro tips jupitar transit lucky zodiac 2023 horoscope astrology news marathi

देवगुरु बृहस्पतीच्या कृपेने मकर राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष यशाने भरलेले असेल. आर्थिक लाभामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. आई-वडील आणि कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 तास त्याची पुष्टी करत नाही.) 

2/5

या राशीच्या लोकांचा कोणाशी तरी असलेला वाद संपुष्टात येईल

astro tips jupitar transit lucky zodiac 2023 horoscope astrology news marathi

गुरुच्या कृपेने नवीन वर्ष कन्या राशीच्या लोकांसाठी चांगली बातमी असेल. या राशीचे लोक विवेक आणि बुद्धीचा वापर करून सर्व समस्यांना सामोरे जातील. नशीब तुमची साथ देईल आणि कोणाशी तरी सुरू असलेला वाद संपुष्टात येईल.   

3/5

या राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन सुखाचे

astro tips jupitar transit lucky zodiac 2023 horoscope astrology news marathi

2023 हे वर्ष कर्क राशीसाठीही खूप शुभ असणार आहे. त्यांच्यासाठी नशिबाचे दरवाजे उघडतील आणि प्रत्येक काम नशीबाच्या जोरावर पूर्ण होईल. कुटुंबात आनंदाचे आणि सौहार्दाचे वातावरण राहील. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य वेळ असेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.   

4/5

या राशीच्या लोकांची परदेशी प्रवासाची इच्छा होईल पुर्ण

astro tips jupitar transit lucky zodiac 2023 horoscope astrology news marathi

मेष राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष लकी ठरणार आहे. या दरम्यान मेष या राशीवर गुरूची विशेष कृपा असेल. तुम्हाला विविध समस्यांपासून आराम मिळेल आणि तुम्ही यशाची शिडी चढत राहाल. नवीन जबाबदारी मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. जे तरुण परदेशात जाण्याच्या बेतात होते त्यांची इच्छा यादरम्यान पुर्ण होईल.

5/5

पाहा कोणत्या राशी आहेत नशीबवान

astro tips jupitar transit lucky zodiac 2023 horoscope astrology news marathi

बृहस्पति हा बुद्धिमत्ता आणि शिक्षणाचा कारक मानला जातो. 2023 मध्ये काही राशींवर देवगुरू गुरूची विशेष कृपा असणार आहे. तेव्हा 'या' काही राशींच्या लोकांसाठी हे नवीन वर्ष वरदानापेक्षा कमी नसेल, या काळात 'या' राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती खूप मजबूत होईल. नोकरदार आणि व्यावसायिकांना प्रगती दिसेल.