टेलीस्कोपचा जुगाड कार! 'ब्लू मून', 'नो शॅडो डे'...लवकरच आकाशात अद्भूत नजारा

Astronomical Events On August 2023 : खगोलप्रेमींसाठी ऑगस्ट महिन्या अद्भूत नजारा घेऊन आला आहे. कारण ब्लू मून, नो शॅडो डे यासारख्या खगोलीय घटनांची पर्वणी असणार आहे. 

Aug 09, 2023, 13:12 PM IST

Astronomical Events On August 2023 : ग्रह गोचर आणि खगोलीय घटन्यांमुळे ऑगस्ट महिना अतिशय खास आहे. या महिना अत्यंत दुर्मिळ खगोलीय घटनाची (Astronomical Events 2023) अद्भूत नजारा घेऊन आला आहे. हा अद्भूत आणि दुर्मिळ नजारा पाहून तुमचेही डोळे विस्फारतील. 

1/10

अवकाशातील अनेक रहस्य दडली आहेत. लवकरच तुम्हाला सूपरमूनसह सूर्य आणि शनीचा संयोगसह नो शॅडो यांचा अनुभव घेता येणार आहे. या महिन्यातील खगोलीय घटनांबद्दल जाणून घेऊयात. 

2/10

येत्या 18 ऑगस्टला नो शॅडो डे साजरा केला जाणार आहे. नो शॅडो डे म्हणजे तुम्ही तुमची सावली बघू शकणार नाहीत. ही एक खगोलीय घटना आहे ज्यामध्ये सूर्य पृथ्वीच्या अगदी वरच्या बाजूला असतो. त्यामुळे या दिवशी अनेक देशांमध्ये आपली सावली आपली साथ सोडते.   

3/10

तुम्हाला वाटतं की आपली सावली गायब झाली आहे तर असं नाही, या दिवशी सूर्याची किरणं उभी पडतात. त्यामुळे आपली सावली इकडे तिकडे न दिसता ती आपल्या पायाखाली असते. त्यामुळे आपल्याला आपलीच सावली दिसत नाही. 

4/10

या महिन्यातील अजून एक अद्भूत दृश्य म्हणजे फूल मून, सूर्य आणि शनीची युती होणार आहे. हा अतिशय दुर्मिळ घटना आहे. 27 ऑगस्टला सूर्य आणि शनीच्या अगदी विरुद्ध बाजूला असणार आहे.

5/10

 दुर्मिळ खगोलीय घटना अनेक वर्षांतून एकदाच पाहायला मिळत असतात. त्यामुळे खगोलप्रेमींनीसाठी ही एक पर्वणीच असते. स्कायवॉचर्सना दुर्बिणीद्वारे ग्रहांची ही जुगलबंदी सहज पाहायला मिळणार आहे.

6/10

यावेळी शनीची अवस्था सहज पाहता येणार आहे. शनीच्या भोवतालचं वयलही अगदी सहज दिसणार आहे. 27 ऑगस्टची ही रात्र खूप रंजक ठरणार आहे, यात काही शंका नाही. ब्लू मून ही घटना सुमारे अडीच वर्षांतून एकदा येते. 

7/10

शनी नंतर 30 ऑगस्टचा दिवसही लक्षात ठेवा. या दिवशी सूपरफूल मून पाहिला मिळणार आहे. या दिवशी चंद्र आणि पृथ्वी अगदी जवळ आल्यामुळे जगातील सर्वात तेजस्वी सूपरमून पाहिला मिळणार आहे.

8/10

'ब्लू मून' हा पूर्वी 22 ऑगस्ट 2021 ला दिसला होता. या सर्व दुर्मिळ खगोलीय घटना असून या अनेक वर्षांनंतर पाहायला मिळतात.   

9/10

यंदा 30 ऑगस्टला 'ब्लू मून' दिसणार आहे. सुपरमूनलाच'ब्लू मून' म्हटलं जात. याचा अर्थ या दिवशी चंद्र आपल्याला निळा दिसणार असा होत नाही. तर एका महिन्यात दोन पौर्णिमा आल्या तर दुसरी पौर्णिमालै सुपरमूनला 'ब्लू मून' असं म्हणतात. 

10/10

सर्वात नयनरम्य दृश्यांसाठी चंद्रोदय किंवा चंद्रास्ताच्या वेळी रात्रीच्या आकाशाकडे पाहण्यासाठी खगोलप्रेमींना अद्भूत नजारा पाहिला मिळेल.