'बिग बॉस'चा आवाज ऐकलात आता फोटोही पाहा

Jan 13, 2018, 19:40 PM IST
1/6

Atul Kapoor

Atul Kapoor

टीव्हीवरील वादग्रस्त आणि बहुचर्चित रिअॅलिटी शो 'बिग बॉस'च्या सीजनमध्ये विजेता कोण बनणार याचा खुलासा १४ जानेवारी रोजी होणार आहे. नेहमीच प्रमाणे यावेळी ही 'बिग बॉस'चा ११वा सीजनही वादात सापडलं आहे. या दरम्यान, आम्ही तुमच्यासाठी एक अशी बातमी घेवून आलो आहोत ज्याची वाट तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून पाहत होते. होय, आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीसंदर्भात सांगणार आहोत जो रिअॅलिटी शो 'बिग बॉस'मध्ये कधीच दिसत नाही. मात्र, गेल्या १० सीजनपासून आतापर्यंत त्यांचा आवाज आपण नेहमीच ऐकत आलो आहोत.

2/6

Atul Kapoor

Atul Kapoor

आम्ही बोलत आहोत अतुल कपूर यांच्याबाबत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अतुल कपूरचं 'बिग बॉस'चा आवाज आहेत. भलेही अतुल पडद्यामागे असतात मात्र, त्यांचा आवाजच 'बिग बॉस'ची खरी ओळख आहे.

3/6

Atul Kapoor

Atul Kapoor

अतुल 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोचा महत्वपूर्ण हिस्सा आहेत. शोच्या पहिल्या सीजनपासूनच अतुल बिग बॉससोबत जोडले आहेत. अतुल हे एक अभिनेते आणि वॉईस ओव्हर आर्टिस्ट आहेत. ते गेल्या १० वर्षांपासून 'बिग बॉस'सोबत आहेत. 

4/6

Atul Kapoor

Atul Kapoor

२८ डिसेंबर १९६६ मध्ये अतुल यांचा मुंबईत जन्म झाला. आपल्या करिअरची सुरुवात त्यांनी २००२ साली वॉईस ओवर आर्टिस्ट म्हणून केली. यामध्ये त्यांना प्रचंड यश मिळालं. इतकचं नाही तर हॉलिवूड सुपरहीरोजच्या सिनेमांतही त्यांचा सहभाग होता.

5/6

Atul Kapoor

Atul Kapoor

हॉलिवूड सिनेमा 'आयरन मॅन', 'अॅव्हेंजर' व्यतिरिक्त इतरही सिनेमांच्या हिंदी डबिंगसाठी अतुल कपूर यांनी आपला आवाज दिला आहे.

6/6

Atul Kapoor

Atul Kapoor

बिग बॉस सीजन दरम्यान घरातील सदस्यांप्रमाणेच अतुलही एक सिक्रेट रुममध्ये राहतात. या ठिकाणी ते आपले मित्र आणि परिवारातील सदस्यांनाही भेटू शकत नाहीत. इतकचं नाही तर त्यांचं लोकेशनही गुप्त ठेवण्यात येतं. (सर्व फोटो सौजन्य: फेसबुक)