प्रवाहाविरुद्ध जाणाऱ्यांनो, 'ही' आहे तुमच्या यशाची गुरुकिल्ली

Jan 23, 2019, 17:45 PM IST
1/5

प्रवाहाविरुद्ध जाणाऱ्यांनो, 'ही' आहे तुमच्या यशाची गुरुकिल्ली

यशाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन हा अनेकदा वेगळा असतो. मुख्य म्हणजे यशाच्या संकल्पनाच अनेकांसाठी वेगळ्या आणि तितक्याच व्यापक असतात. 'हॅरी पॉटर' या पुस्तकांच्या मालिकेमुळे आपली खास ओळख प्रस्थापित करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका जे.के.रोलिंग यांच्या वाट्याला आलेलं यशही अशाच वेगळ्या संकल्पना आणि दृष्टीकोनातून आकारास आलं आहे. नेहमीच इतरांप्रमाणे वागत किंवा सर्वजण चालत असलेल्या वाटांवरुन जात असतानाच यश गवसेल असं नाही. अनेकदा प्रवाहाविरुद्ध झात आणि काही गोष्टींना शह देतसुद्धा यशस्वी होता येतं. चला तर मग रोलिंग यांच्याच नजरेतून यशाच्या या हटके निकषांवर नजर टाकूयात... 

2/5

धोका पत्करा

कोणतीही वाट चालतेवेळी त्यात धोका येणार हे अटळच असतं. पण, काहीजण तो धोका किंवा येणारे अडथळे पाहून सुरुवातीलाच माघार घेतात. पण, खरंच याची गरज आहे का? धोका पत्करत जेव्हा ती वाट आपल्याला कोणा एका टप्प्यावर पोहोचवते तेव्हा मिळणारा आनंद आणि यश हे कैक पटींनी समाधान देऊन जातं. 

3/5

साचेबद्ध गोष्टी विसरा

या गोष्टी कराच या एका ओळी अंतर्गत बरेच सल्ले दिले जातात. पण, ही साचेबद्धता विसरणं महत्त्वाचं आहे. यासाठी स्वतंत्र विचारसरणी, शिस्तप्रियता आणि एकाग्रता अत्यंत गरजेची आहे. 

4/5

अपयशाने खचून जाऊ नका

अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे, ही बाब अनेकजण  लक्षात घेतात. पण, तेच अपयश वारंवार यशाच्या मार्गात येऊ लागतं तेव्हा मात्र मनावर प्रचंड ताण येतो. अशा वेळी सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. पण, अपयशाने खचून न जाता आणि परिस्थितीपुढे हतबल न होता यशशिखरावर पोहोचण्याकडेच लक्ष द्यावं. यामुळेच तुम्ही स्वत:चेच प्रेरणास्त्रोत व्हाल. 

5/5

बदलासाठी तयार राहा

यशाच्या दिशेने होणारी वाटचाल तेव्हाच खऱ्या अर्थाने पुढे जाते जेव्हा तुम्ही स्वत:च्या मर्यादा ओलांडत, स्वत:लाच आव्हान देत येणाऱ्या प्रत्येक बदलाला आपलंसं करता. शक्य असेल तितकं शिकत नेहमीच बदलासाठी तयार राहा.