'या' SUV कडून Creta-Brezza चितपट; 7.8 लाखांच्या किमतीत मिळतंय Best Deal

Best Selling SUV: सहसा काही वाहनांना अनेकांचीच पसंती मिळते. तर, काही वाहनं या शर्यतती उशिरानं येऊनही आघाडीच्या मॉडेल्सना पिछाडीवर टाकतात.   

May 13, 2023, 08:51 AM IST

Best Selling SUV: हल्लीच्या दिवसांमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबांतूनही कार खरेदी करण्यासाठीचे बेत आखले जातात. आर्थिक जुलवाजुळव केली जाते आणि सरतेशेवटी हक्काची कार दारी आणली जाते. हे स्वप्न साकार होण्याचा आनंद काही औरच असतो. 

1/7

कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहताय?

auto news Best Selling SUV tata nexon maruti brezza creta price

तुमच्याआमच्यापैकी अनेकांनीच तो आनंद अनुभवला असेल. जे अद्यापही कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहेत, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. 

2/7

कॉम्पॅक्ट एसयुव्ही

auto news Best Selling SUV tata nexon maruti brezza creta price

सध्याच्या घडीला बड्या कार कंपन्यांनी 10 लाख रुपयांच्या किमतीत सब कॉम्पॅक्ट एसयुव्ही उपलब्ध करून दिल्या आहेत. ज्यामुळं या कारच्या मागणीतही सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. 

3/7

एसयुव्ही

auto news Best Selling SUV tata nexon maruti brezza creta price

एसयुव्हीचे मॉडेल आतापर्यंत बऱ्याच कार कंपन्यांनी उपलब्ध करून दिले. पण, त्यातही एका कार कंपनीनं बऱ्याच वर्षांपासून या जगतात आघाडीवर असणाऱ्या ह्युंडाई क्रेटालाही पिछाडलं आहे. 

4/7

टाटा नेक्सन

auto news Best Selling SUV tata nexon maruti brezza creta price

मार्च महिन्याच्या आकडेवारीमध्ये दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या नेक्सननं पुन्हा एकदा एप्रिलमद्ये सर्वोत्तम एसयुव्हीच्या यादीत अग्रस्थान मिळवलं आहे. एप्रिल महिन्यात 15002 युनिट्सची विक्री झाल्यामुळं ही देशातील अधिक पसंतीची एसयुव्ही ठरली आहे. 

5/7

नेक्सन

auto news Best Selling SUV tata nexon maruti brezza creta price

7.80 लाख रुपयांपासून 14.50 लाख रुपयांपर्यंतच्या दरात (एक्स-शोरूम) Nexon तुम्ही खरेदी करु शकता. ही कार तुम्हाला  8 ट्रिम: XE, XM, XM (S), XM+ (S), XZ+, XZ+ (HS), XZ+ (L) आणि XZ+ (P) मध्ये मिळते.  

6/7

ह्युंडाई क्रेटा

auto news Best Selling SUV tata nexon maruti brezza creta price

कारच्या या यादीत दुसऱ्या स्थानावर ह्युंडाई क्रेटा असून, एप्रिल 2023 मध्ये या कारची विक्री 12.13 टक्क्यांनी वाढली. थोडक्यात इतक्या वर्षांपासून पसंती असणारी क्रेटा आता मागं पडली आहे. 

7/7

ब्रेझा

auto news Best Selling SUV tata nexon maruti brezza creta price

खिशाला परवडणाऱ्या एसयुव्ही गाड्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर सध्या मारुती सुझुकी ब्रेझा, चा समावेश आहे. या कारच्या विक्रीमध्ये 0.61 टक्क्यांनी वाढ झाल्याचं लक्षात येतं.