पैसे, सोनं, प्रसाद... अंबानींपासून अदानीपर्यंत राम मंदिरासाठी पाहा कोणी किती केलं दान?

Ayodhya Ram Mandir Trust: अयोध्येत पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. हा दिवस संपूर्ण देशात दिवाळीसारखा साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गज सहभागी झाले होते. यात राजकीय, उद्योगपती, खेळाडू आणि बॉलिवूड कलकारांचा समावेश होता.

| Jan 23, 2024, 14:53 PM IST
1/7

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडल्यानंतर आता हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं झालंय. देशभरातून भाविक रामाच्या दर्शनासाठी दाखल झालेत. सकाळी 8 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते रात्री 10 पर्यंत रामाचं दर्शन घेता येणार आहे. सकाळी 2 तासात तब्बल 1 लाख 70 हजार भाविकांनी प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलंय. अद्यापही अयोध्येतील रस्त्यांवर भक्तांचा महापूर पाहायला मिळतोय. 

2/7

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले उद्योगपती मुकेश अंबानी यांनी सह कुटुंब अयोध्येत हजेरी लावली होती. मुकेश अंबानी यांच्यासह पत्नी नीता अंबानी, मुलगी ईशा, जावई आनंद पिरामल, मुलगा आकाश आणि अनंत तसंच सून श्लोका मेहता आणि राधिका मर्चंटी यांनी प्रभू श्री रामाचं दर्शन घेतलं. अंबानी कुटुंबाने आतापर्यंत 10 कोटींचं दान केल्याचा दावा केला जात आहे. अंबानी कुटुंबाने राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला 2 कोटी 51 लाख रुपयांचं दान केलं आहे.

3/7

सूरतमधल्या एका व्यापाऱ्याने राम मंदिरासाठी आतापर्यंत सर्वात जास्त दान दिलं आहे. या व्यापाऱ्याचं नाव दिलीप कुमार लाखी असन ते हिरे व्यापारी आहेत. लाखी यांनी तब्बल 101 किलो सोनं दान केलं आहे. याची किंमत जवळपास 68 कोटी रुपये इतकी आहे. दिलीप कुमार लाखी यांची सूरतमध्ये देशातील सर्वात मोठी हिरे फॅक्ट्री आहे. लाखी यांनी दान केलेल्या सोन्याचा वापर राममंदिराचे दरवाजे, त्रिशूळ आणि डमरूसाठी करण्यात आलाय. 

4/7

गुजरातचे आणखी एक हिरा व्यापारी गोविदभाई ढोलकिया यांनी 11 कोटी रुपयांचं दान केलं आहे. गोविंदभाई ढोलकिया हे श्रीरामकृष्णा एक्सपोर्ट्स डायमंड कंपनीचे मालक आहेत.   

5/7

उद्योगपती गौतम अदानी यांनी राम मंदिर उभारणीत किती दान केलं आहे याची माहिती अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार अदानी समुहाच्या अदानी विल्मरने फॉर्च्युन ब्रँडसह प्राण प्रतिष्ठा समारोहासाठी प्रसाद तयार केला होता. 

6/7

याशिवाय इलेक्ट्रिक सामग्री बनवणारी कंपनी हॅवेल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने मंदिराच्या लायटिंगची जबाबदारी सांभाळली होती. 

7/7

डिएनएच्या रिपोर्टनुसार मोरारी बापू यांनी सर्वाधिक 16.3 कोटी रुपयांचं दान केलं आहे. याशिवाय दान देणाऱ्या मंदिरांमध्ये पटनाच्या महावीर मंदिराने राम मंदिर ट्रस्टसाठी 10 कोटी रुपयांच दान केलंय.