रामलल्लासाठी नाशिकमधून खास पुष्पहार, विविध देशांची कला वापरुन 'या' तरुणींनी तयार केली खास माळ

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील श्रीराम मंदिरात आज मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात रामलल्लांसाठी श्रीमाळ (पुष्पहार) नाशिक येथून रवाना झाली असून, ही श्रीमाळ अनुष्का पाटील व तिच्या तीन मैत्रिणींनी बनवली आहे. 

Jan 22, 2024, 07:18 AM IST
1/7

आज श्रीराम मंदिरात होणाऱ्या रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या रामलल्लांसाठी पुष्पहार नाशिकमधून तयार करण्यात आला.   

2/7

फ्लावर आर्ट बाय अनुष्काच्या संचालक असलेल्या अनुष्का नाशिक  येथील विविध मंदिरात उत्सवासाठी पुष्पहार बनवून देत असतात.   

3/7

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिराला भेट दिली असतात, त्यावेळी वारकरी संप्रदाय व संस्थानतर्फे तुळशीहार अर्पण करुन मोदींचे स्वागत करण्यात आले  होते. 

4/7

त्यावेळी हा पुष्पहार आवडल्याने व श्रीरामास चढविलेला फुलांचा आकर्षक साज पाहून मोदी यांनी कौतुकाची थापही दिली.  

5/7

यानंतर अयोध्या येथे श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पुष्पहार पाठविण्याचे कळविल्याने एक छान पुष्पहार श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तासोबत अयोध्येला पाठविण्यात आला. 

6/7

तसेच या सोहळ्यासाठी  जवळपास दहा ट्रक झेंडूची फुलं आली असून या फुलांची हार, माळा आणि आरास केली जाणारे.

7/7

यासाठी जवळपास 700 जण काम करतायत. भारतातूनच नाही तर परदेशातूनसुद्धा विविध फुलांनी आयोध्या सजवण्याचे काम केलं जातंय..