Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : झी समूहाचे संस्थापक डॉ. सुभाष चंद्रा यांच्यासह कोणकोणते मान्यवर अयोध्येत दाखल?

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : मान्यवर आणि आमंत्रितांच्या उपस्थितीत हा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार असून, या सोहळ्यासाठी अनेक व्हीव्हीआयपींची हजेरी पाहायला मिळत आहे. 

Jan 22, 2024, 10:32 AM IST

मिताली मटकर, झी मीडिया, अयोध्या : Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामलल्लांची मूर्ती विराजमान झाली असून आता या मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही पार पडणार आहे. 

1/7

व्हीव्हीआयपी, सेलिब्रेटींची गर्दी

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha zee media chairman subhash chandra on auspecious day

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्या नगरीत सध्या हजारो व्हीव्हीआयपी, सेलिब्रेटींनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. 

2/7

कडेकोट बंदोबस्त

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha zee media chairman subhash chandra on auspecious day

काही क्षणांमध्येच प्रभू श्री राम यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला सुरूवात होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारातून हजारो व्हीव्हीआयपी कार्यक्रमासाठी दाखल होत आहेत. 

3/7

डॉ. सुभाष चंद्रा यांनी केली मंदिराची पाहणी

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha zee media chairman subhash chandra on auspecious day

झी समूहाचे संस्थापक डॉ. सुभाष चंद्रा हेसुद्धा अयोध्येतेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी झाले आहेत. डॉ. सुभाष चंद्रा यांनी रविवारी अयोध्येतील राममंदिराची पाहणीसुद्धा केली होती.   

4/7

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी रवाना

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha zee media chairman subhash chandra on auspecious day

राममंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा डॉ. सुभाष चंद्रा यांच्यासोबत होते. डॉ. सुभाष चंद्रा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी रवाना झाले आहेत. यावेळी हा अतिशय नशिबाचा दिवस असून आपण नशीबवान असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

5/7

हिंदू संस्कृती

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha zee media chairman subhash chandra on auspecious day

हिंदू समाज आणि संस्कृती ही अतिशय सहनशील संस्कृती असल्याचं म्हणत त्यांनी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली.   

6/7

योगी आदित्यनाथ

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha zee media chairman subhash chandra on auspecious day

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीसुद्धा अयोध्या गाठली असून प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी ते मंदिर परिसरात दाखल झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांकडून करण्यात आलेल्या स्वागताचा स्वीकार केला. 

7/7

पीटी उषा

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha zee media chairman subhash chandra on auspecious day

भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्षा आणि राज्यसभेच्या सदस्या, पीटी उषा यांनीसुद्धा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राम मंदिर परिसरात हजेरी लावली.