बाळाला बाटलीतून दूध पाजत असाल तर सावधान! नाही तर होतील गंभीर आजार

बाटलीबंद दूध पाजणं बंद नाही केलं नाही तर बाळाला गंभीर आजार होऊ शकतात. जाणून घ्या बाळाच्या आरोग्याला कशा प्रकारे धोका निर्माण होवू शकतो. 

Aug 06, 2023, 23:39 PM IST

baby health : ही बातमी आहे तुमच्या बाळाशी निगडीत. तुम्ही तुमच्या बाळाला बाटलीतून दूध पाजताय. हा विचार करुन की तुमचं बाळ सुदृढ होईल. मात्र, हे लक्षात घ्या कारण बाटलीतल्या दूधाने तुमचं बाळ आजारी पडू शकतं. बाटलीतलं दूध तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे बाळांचे आरोग्य धोक्यात येवू शकते. 

1/5

आईच्या दूधामुळे बाळाची रोगप्रतिकाराक शक्तीही चांगली राहते. मात्र बाहेरच्या दूधाने त्याचं पोट बिघडतं. बाटल्यांसाठी वापरल्या जाणा-या प्लॅस्टिकमुळेही बाळासाठी हे दूध हानिकारक ठरू शकतं. तेव्हा तुमच्या काळजाच्या तुकड्याला सुदृढ ठेवायचं असेल तर त्याची काळजी तुम्हालाच घ्यावी लागेल. 

2/5

स्तनपानातून बाळाला आवश्यक जीवनसत्वे, पोषकद्रव्ये तसंच अँटीबॉडीज त्याला मिळतात. त्यामुळे बाळाची प्रकृती चांगली राहण्यास मदत होते.

3/5

लहान बाळासाठी आईचं दूध फार महत्त्वाचं असतं. आईचं दूध म्हणजे बाळासाठी एक प्रकारे अमृतच असतं. बाळाच्या वाढीसाठी लागणा-या सर्व चांगल्या गोष्टी त्याला स्तनपानातून मिळतात.. म्हणूनच कायचम पहिले सहा महिने तरी बाळाला स्तनपान करणं गरजेचं असतं.

4/5

बाटलीतल्या दुधामुळे आईचं दूध पिण्याची बाळाची सवय सुटू शकते किंवा बदलूही शकते. तेव्हा बाळांना बाटलीने दूध पाजू नका असं आवाहन तज्ज्ञांनीही केले आहे.

5/5

बाटलीतल्या दुधामुळे बाळाला संसर्ग होऊ शकतो. त्याची तब्येत बिघडू शकते. खास करुन बाळाचं पोट बिघडणे, जुलाब होणे असे आजार होऊ शकतात. तसंच बाळाचे दात किडण्याचाही धोका असतो.