दररोज फक्त 30 मिनिटे जॉगिंग केल्यास 'हे' गंभीर आजार राहतील दूर

Benefits Of Jogging: तुम्हाला जिममध्ये जाऊन व्यायाम करण्यास वेळ नसेल तर जॉगिंग करुन तुम्ही  वजन कमी करण्यापासून ते मानसिक आरोग्य सुधारण्यापर्यंतचे अनेक आरोग्य फायदे मिळवू शकता. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

| Nov 27, 2023, 10:01 AM IST

Benefits Of Jogging: तुम्ही दररोज जॉगिंग केल्यास हृदय निरोगी राहते आणि हृदय रोगाचा धोका कमी होतो. तुम्ही रोज फक्त 30 मिनिटे जॉगिंगसाठी दिलात तर अनेक गंभीर आजार तुमच्या जवळपासही फिरकणार नाहीत.

1/9

दररोज फक्त 30 मिनिटे जॉगिंग केल्यास 'हे' गंभीर आजार राहतील दूर

Benefits Of Jogging 30 Minutes Daily Health Tips In Marathi

Benefits Of Jogging: सध्या धक्काधकीच्या जिवनात आपला बराच वेळ प्रवास आणि कामावर जातो. त्यामुळे अंगाची हालचाल होत नाही. वर्तमानात याचे काही परिणाम जाणवत नसले तरी भविष्यात खूप वाईट परिणाम दिसून येतात. त्यामुळे तुम्हाला वेळीच सतर्क राहणे आवश्यक आहे.

2/9

आजार राहतील दूर

Benefits Of Jogging 30 Minutes Daily Health Tips In Marathi

तुम्ही दररोज जॉगिंग केल्यास हृदय निरोगी राहते आणि हृदय रोगाचा धोका कमी होतो. तुम्ही रोज फक्त 30 मिनिटे जॉगिंगसाठी दिलात तर अनेक गंभीर आजार तुमच्या जवळपासही फिरकणार नाहीत. 

3/9

आरोग्यास फायदे

Benefits Of Jogging 30 Minutes Daily Health Tips In Marathi

तुम्हाला जिममध्ये जाऊन व्यायाम करण्यास वेळ नसेल तर जॉगिंग करुन तुम्ही  वजन कमी करण्यापासून ते मानसिक आरोग्य सुधारण्यापर्यंतचे अनेक आरोग्य फायदे मिळवू शकता. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

4/9

निरोगी फुफ्फुस

Benefits Of Jogging 30 Minutes Daily Health Tips In Marathi

दररोज 30 मिनिटे धावल्यास श्वासोच्छवासाच्या समस्यांपासून दूर राहता येईल.तसेच तुमचे फुफ्फुस दीर्घकाळ निरोगी राहण्यास मदत होईल. धावण्याने आपली फुफ्फुसे चांगली कार्य करतात. तसेच शरीरातील ऑक्सिजनची प्रक्रिया सुधारते.

5/9

बीपीच्या रुग्णांसाठी फायदेशीर

Benefits Of Jogging 30 Minutes Daily Health Tips In Marathi

उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या किंवा बीपी नियंत्रणात नसलेल्या व्यक्तींनी रोज धावायला हवे. तुम्ही नियमितपणे सावकाश चालल्यास रक्तवाहिन्या ताणल्या जातात आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.

6/9

मानसिक आरोग्य

Benefits Of Jogging 30 Minutes Daily Health Tips In Marathi

तणाव, चिंता आणि नैराश्य यासारख्या परिस्थितींमध्ये सुधारणा करून मानसिक आरोग्य मजबूत करण्यासाठी हा एक प्रभावी व्यायाम आहे. जेव्हा तुम्ही हळू चालता, तेव्हा आपला मेंदू एंडॉर्फिन नावाचे फील-गुड हार्मोन्स सोडते. जे तुमचा मूड सुधारते आणि तुम्हाला आनंदी बनवते.

7/9

वजनात मदत

Benefits Of Jogging 30 Minutes Daily Health Tips In Marathi

वाढत्या वजनासोबत शरिरात अनेक आजार येतात. पण नियमित धावल्याने अतिरिक्त कॅलरी बर्न होते वजन नियंत्रित करण्यास मदत करते. वजन कमी करायचं असलं तरी हा व्यायाम तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो.

8/9

रात्री चांगली झोप

 Benefits Of Jogging 30 Minutes Daily Health Tips In Marathi

दररोज धावणे मानसिक आरोग्य सुधारते तसेच थकवा आणि तणाव कमी करून मूड सुधारते. यामुळे तुम्हाला आराम वाटतो आणि रात्री लवकर झोप येते. यामुळे तुम्हाला चांगल्या दर्जाची झोप मिळते.

9/9

हृदयाच्या आरोग्याची काळजी

Benefits Of Jogging 30 Minutes Daily Health Tips In Marathi

नियमित धावल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास, रक्तदाब, मधुमेह आणि लठ्ठपणा इत्यादीसारख्या हृदयविकाराच्या जोखीम घटकांमध्ये सुधारणा करण्यास मदत करते. यासोबतच हृदयविकाराचा झटका, हार्ट फेलियर आणि स्ट्रोकपासून तुमचे संरक्षण होते.