स्वस्तात मस्त घ्या 5G स्मार्टफोन, एका क्लिकवर मिळेल टॉप 5 ची लिस्ट

Best 5G phones in 2023 :  रिलायन्स जिओने भारतातील अनेक प्रमुख शहरांमध्ये 5G सेवा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे अनेक लोक 5G स्मार्टफोन खरेदी करत आहेत. आता देशातील अनेक स्मार्टफोन कंपन्या बजेटमध्ये 5G स्मार्टफोन लॉन्च करत आहेत. तुम्हाला पण फास्ट इंटरनेट स्पीड आणि 5G सपोर्ट असलेले डिव्हाइस खरेदी करायचा असेल तर या ठिकाणी काही खास बजेटमध्ये माहिती देत आहोत. जर तुम्ही पण 5G फोन घेणार असाल तर ही बातमी नक्की वाचा...

Apr 26, 2023, 16:27 PM IST
1/7

Realme 9 5G

Realme 9 5G फोनचा 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज व्हेरिएंट सध्या Amazon वरून 14,990 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट 6.5-इंचाचा डिस्प्ले आहे आणि फोटोग्राफीसाठी, हा फोन 48-मेगापिक्सेल प्राथमिक लेन्ससह सुसज्ज असलेल्या ट्रिपल रिअर कॅमेराला सपोर्ट करतो. Realme मोबाईल फोन 16MP फ्रंट सेन्सर सेल्फीसाठी आहे. त्याचबरोबर पावर बॅकअपसाठी स्मार्टफोनमध्ये 5,000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

2/7

Vivo T1 5G

 Vivo चा मोबाईल 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट केवळ 14,499 रुपयांना खरेदी करता येईल. फोनमध्ये 5,000mAh बॅटरी काही मिनिटांत चार्ज करते.  Vivo T1 5G फोनमध्ये 6.58 इंचाचा डिस्प्ले आहे. जो 180Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी, या मोबाइल फोनमध्ये 50MP + 8MP + 2MP ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 16MP सेल्फी कॅमेरा आहे. 

3/7

iQOO Z6 5G

iQoo Z6 5G फोन 4GB RAM + 128GB स्टोरेजसह 13,999 रुपयांच्या किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. हा मोबाइल फोन 6.58 इंच मोठ्या डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 120Hz रिफ्रेश रेटवर काम करतो. फोटोग्राफीसाठी यात 50MP + 2MP + 2MP ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 16MP सेल्फी कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन 18W फास्ट चार्जिंगसह 5,000 mAh बॅटरीने सुसज्ज आहे.

4/7

Samsung Galaxy M14 5G

Samsung Galaxy M14 5G फोनच्या 4 GB रॅम व्हेरिएंटची किंमत 13,490 रुपये आणि 6 GB रॅम व्हेरिएंटची किंमत 14,490 रुपये आहे. दोन्ही मॉडेल 128 GB स्टोरेजला सपोर्ट करतात. Samsung Galaxy M14 5G फोन 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह 6.6-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लॉन्च करण्यात आला आहे. फोनच्या मागील पॅनलवर 50-मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे आणि समोर 13-मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे. यामध्ये 6,000 mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. 

5/7

POCO M4 5G

Poco M4 5G फोन 12,999 रुपयांच्या किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन 4 GB रॅम सह 64 GB स्टोरेज ला सपोर्ट करतो. ज्यामध्ये प्रोसेसिंग साठी MediaTek Dimensity 700 चिपसेट देण्यात आला आहे. फोनमध्ये 6.58-इंचाचा फुलएचडी + डिस्प्ले आहे आणि फोटोग्राफीसाठी 50-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सल ड्युअल रियर कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा मोबाइल फोन पॉवर बॅकअपसाठी 5,000 mAh बॅटरीलाही सपोर्ट करतो. 

6/7

Redmi Note 10T 5G

Xiaomi Redmi Note 10T 5G हा सध्या भारतीय बाजारपेठेतील सर्वात स्वस्त 5G मोबाईल फोन आहे. हा स्मार्टफोन फक्त 11,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. ज्यामध्ये MediaTek Dimensity 700 चिपसेट 4 GB RAM सह कार्यक्षमतेसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन 6.5 इंच मोठ्या डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 90Hz रिफ्रेश रेटवर काम करतो. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील पॅनलवर 48 MP + 2 MP + 2 MP ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे आणि सेल्फीसाठी फोनमध्ये 8 MP फ्रंट कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी, Redmi Note 10T 5G फोन मोठ्या 5,000 mAh बॅटरीला सपोर्ट करतो.  

7/7

Lava Blaze 5G

Lava Blaze 5G स्मार्टफोनमध्ये 6.51-इंचाचा HD + IPS (720×1,600) डिस्प्ले आहे. हा फोन Android 12 वर चालतो. फोनमध्ये MediaTek चा Dimensity 700 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 3GB व्हर्चुअल रॅम सपोर्ट करण्यात आला आहे. Lava Blaze 5G स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आहे. यासोबतच फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असून या लावा फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि USB-C OTG सपोर्ट आहे. हा फोन 10,999 रुपयांमध्ये मिळत आहे.