नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये जंगल सफारीला जायचंय? 'ही' घ्या Best ठिकाणांची यादी

Best Jungle Safari Tourist Places in India: सध्या सुट्ट्यांचा माहोल सुरू आहे आणि या सुट्ट्यांच्या संपूर्ण माहोलामध्ये अनेकजण भटकंतीचे बेत आखत आहेत.  

Nov 13, 2024, 12:39 PM IST
1/8

पर्यटन

Best Safari Trips To Take In November

Best Safari Trips To Take In November : नेहमीच्याच साचेबद्ध पर्यटनाला शह देत काही मंडळी थेट ही चौकट मोडत जंगल सफारी आणि तत्सम गोष्टींना प्राधान्य देताना दिसत आहेत. अशाच काही Best जंगल सफारीच्या ठिकाणांची यादी पाहा आणि नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये खुशाल फिरा...   

2/8

रणथंबोर

Best Safari Trips To Take In November

रणथंबोर नॅशनल पार्क - राजस्थानातालील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्याची संधी देणारं हे ठिकाण आहे रणथंबोर राष्ट्रीय उद्यान. हरिणांच्या प्रजातींपासून अस्वलं आणि गुरगुरत येणारे वाघ इथं तुम्हाला पाहायला मिळतील.   

3/8

कान्हा

Best Safari Trips To Take In November

कान्हा नॅशनल पार्क - मध्य प्रदेशातील या जंगल सफारीमध्ये फिरताना नदीच्या किनाऱ्यालगहून जाणारी वाट वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. येथील जैवविविधता पाहण्याजोगी.   

4/8

गीर

Best Safari Trips To Take In November

गीर राष्ट्रीय उद्यान - आशियाई सिंहांच्या अस्तित्वासाठी ओळखलं जाणारं हे आहे गीर राष्ट्रीय उद्यान. गुजरातमध्ये असणाऱ्या या राष्ट्रीय उद्यानात येऊन सफारीचा आनंद घेण्याची मजा काही औरच.   

5/8

ताडोबा

Best Safari Trips To Take In November

ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प - महाराष्ट्रातील महत्त्वाचं राष्ट्रीय उद्यान म्हणजे, ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प. रॉयल बंगाल टायगर अर्थात वाघांच्या या कमाल प्रजातीचं दर्शन या सफारीदरम्यान घडतं.   

6/8

जीम कॉर्बेट

Best Safari Trips To Take In November

जीम कॉर्बेट नॅशनल पार्क - उत्तराखंडमध्ये आलं असता येथील निसर्गाच्या अधिक जवळ जाण्याची संधी देणारी सफारी जीम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात अनुभवता येते.   

7/8

पेंच

Best Safari Trips To Take In November

पेंच राष्ट्रीय उद्यान- महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमाभागात असणाऱ्या पेंच राष्ट्रीय उद्यानामध्ये निसर्ग आणि या निसर्गातील कैक घटकांचं दर्शन होतं.   

8/8

झालना

Best Safari Trips To Take In November

झालना नॅशनल पार्क - जयपूरमध्ये असणाऱ्या झालना राष्ट्रीय उद्यानात बिबट्या प्रजाती पाहून पर्य़टक थक्कच होतात. इथं निसर्गाची विविध रुपं भारावणारी आहेत.