Lohri 2023 Recipe : लोहरीच्या खास मुहूर्तावर तयार करा 'या' खास स्वीट डिश
Best Recipes For Lohri 2023: या उत्सवाची धूम पंजाब आणि अनेक उत्तर भारतीय राज्यांमध्ये पाहायला मिळते. लोहरीच्या निमित्ताने लोक लाकड जाळतात आणि ढोल वाजवून नवीन हंगामाचे स्वागत करतात. पण सण म्हटलं की चविष्ट पदार्थ आलाचं. जर तुम्हाला लोहरीच्या खास मुहूर्तावर काही खास स्वीट डिश बनवायचा असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकते.
Lohri Recipes In Marathi: नवीन वर्ष सुरु झाल्यानंतर येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. या काळात सुर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. सूर्य राशीपरिवर्तन करताना जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो त्या काळाला मकर संक्रांत असे संबोधले जाते. हाच दिवस आपण संक्रांत म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. तर दुसरीकडे मकर संक्रांतीला भारतभर वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. संक्रातीला तामिळनाडूमध्ये पोंगल म्हणतात, केरळमध्ये विलक्कू, कर्नाटकमध्ये इलू बिरोधू, पंजाबमध्य माघी, आसाममध्ये भोगली बिहू तर म्हणतात. तर महाराष्ट्र आंध्रप्रदेश, गुजारत संक्रात म्हटलं जातं.