दारंखिडक्या लावून, फोनही बंद करा; 'हे' सस्पेंस थ्रिलर चित्रपट असेच पाहण्यात खरी मजा

कोण, कुठे, कसं... पिक्चर पाहतानाच क्षणाक्षणाला व्हाल हैराण. का माहितीये....? 

Sep 11, 2024, 11:16 AM IST

Top Suspense Thriller Films: ओटीटीवर नेमकं काय पाहावं, हा प्रश्न अनेकांनाच पडतो. बऱ्याचदा पर्याय खूप असतात. पण, या पर्यायांमधून आपल्याला नेमकं काय हवंय हेच कळत नाही. 

 

1/7

ही यादी तुमच्याचसाठी

best suspense thriller movies on ott list

Top Suspense Thriller Films: सुट्टीच्या दिवशी किंवा मोकळ्या वेळात चित्रपट पाहण्याला पसंती देणारे तुम्हीही आहात का? तर मग ही यादी तुमच्याचसाठी. 

2/7

चित्रपट

best suspense thriller movies on ott list

मनोरंजनासोबतच कमाल चित्रीकरण, कथानक आणि कलाकारांचा अभिनय असं सर्वकाही एकाच ठिकाणी पाहण्याची संधी हे चित्रपट तुम्हाला देणार आहेत. ओटीटीवर हे चित्रपट तुम्ही पाहू शकता. हो, पण ते पाहताना फोन बंद आणि लक्ष फक्त टीव्ही स्क्रीनकडेच असूद्या.   

3/7

ब्रमायुगम

best suspense thriller movies on ott list

भयपट आणि त्याला साहसी कथानकाची जोड 'ब्रमायुगम' या चित्रपटात देण्यात आली आहे. 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये अभिनेता ममूटी, अर्जुन अशोकन आणि सिर्धार्थ भारतन यांच्या भूमिका आहेत. पोर्तुगीज केरळावर चालून येणार होते त्या काळात हे कथानक फिरतं.   

4/7

फरहाना

best suspense thriller movies on ott list

काहीतरी नवी संकल्पना पाहायची असल्यास 'फरहाना' हा उत्तम चित्रपट ठरेल. सोनी लिववर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. चित्रपटाच्या कथानकाला मिळणारी कलाटणी इथं कमाल करून जाते.   

5/7

वन फ्रायडे नाईट

best suspense thriller movies on ott list

मनीष गुप्ता दिग्दर्शित 'वन फ्रायडे नाईट' हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झाला होता. जिओ सिनेमावर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. रवीना टंडन, मिलिंद सोमण यांसारख्या कलाकारांनी या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.   

6/7

माय क्लाईंट्स वाईफ

best suspense thriller movies on ott list

रघुराम सिंह नावाच्या एका व्यक्तीला शोषणाच्या आरोपाअंतर्गत पोलीस अटक करतात. पण, त्याचा खटला लढताना मात्र अनेक अशा गोष्टी पुञे येतात ज्या हादरवून सोडतात असं एकंदर कथानक 'माय क्लाईंट्स वाईफ'मध्ये साकारण्यात आलं आहे. Amazon प्राईमवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.   

7/7

वोडका डायरीज

best suspense thriller movies on ott list

केके मेनन, शबाना आझमी, मंदिरा बेदी यांसारख्या कलाकारांच्या भूमिका असणारा हा चित्रपट म्हणजे, 'वोडका डायरीज'. हा चित्रपट तुम्ही Amazon Prime वर पाहू शकता.