IPL 2023: Ravichandran Ashwin ला मोठा झटका; 'ते' कृत्य पडलं महागात

राजस्थान रॉयल्सचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या आयपीएल सामन्यात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.  

Apr 13, 2023, 22:49 PM IST
1/5

चेपॉक स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करण्यामध्ये आर अश्विनची मोठी भूमिका होती. राजस्थान टीमने हा सामना 3 रन्सने जिंकला. यानतंर त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील देण्यात आला.

2/5

मात्र असं असूनही अश्विनला मोठा धक्का बसला आहे. आयपीएलच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी आर अश्विनला दोषी ठरवण्यात आलं आहे. 

3/5

अश्विनने आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.7 चं उल्लंघन केलंय. यामध्ये अश्विनने आपली चूक मान्य केलीये. यानंतर अश्विनच्या मॅच फीच्या 25 टक्के रक्कम कापण्यात आल्याची माहिती आहे.  

4/5

चेन्नईविरुद्धच्या सामन्यात विजयानंतर अश्विनने अंपायरवर प्रश्न उपस्थित केले होते. त्याच्या म्हणण्यानुसार, अंपायरने राजस्थान रॉयल्सच्या टीमला न विचारता सामन्यादरम्यान बॉल बदलला. 

5/5

राजस्थान टीमला बॉलची कोणतीही अडचण नव्हती. मात्र अंपायरने बॉल बदलण्याचा निर्णय घेतला. यानंतर आर अश्विनने या नियमावर प्रश्न उपस्थित केलं. मात्र आता याचा त्याला फटका बसलाय.