'ते' लॉकेट घातल्याने अभिनेत्याला अटक! होऊ शकतो 3 ते 5 वर्षांचा तुरुंगवास; पाहा Photos

Actor Arrested From Set For Wearing This Locket : थेट सेटवर आल्यानंतर अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी हे लॉकेट मागितलं आणि त्यांनतर काही तासांमध्येच निर्मात्यांनी या अभिनेत्याला सेटवरुनच ताब्यात घेतलं. अचानक घडलेल्या या घडामोडींमध्ये निर्मात्यांसहीत इतर सर्व कलाकारही गोंधळून गेले. नेमकं घडलं काय जाणून घ्या...

| Oct 24, 2023, 16:53 PM IST
1/10

Varthur Santhosh Arrested Tiger Claw Case

बिग बॉस कन्नडच्या 10 वं पर्व सध्या सुरु आहे. ही मालिका सध्या कन्नड प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेमध्ये रोज वेगवेगळे ट्वीस्ट पाहायला मिळत असल्याने प्रेक्षकांना या मालिकेने खिळून ठेवलेलं आहे.

2/10

Varthur Santhosh Arrested Tiger Claw Case

मात्र बिग बॉस कन्नडचा हा कार्यक्रम सुरु असतानाच अचानक या एका स्पर्धकाला पोलिसांनी अटक केली आहे. वारथूर संतोष असं या स्पर्धकाचं नाव आहे. किच्चा सुदीप होस्ट करत असलेल्या बिग बॉस कन्नडच्या 10 व्या पर्वाच्या सेटवरुन या स्पर्धकाला पोलिसांनी अटक केली आहे.

3/10

Varthur Santhosh Arrested Tiger Claw Case

वरथूर संतोषला शुटींग सुरु असलेल्या सेटवरुन पोलिसांनी ताब्यात घेण्यामागील कारण ठरलं त्याच्या गळ्यातील लॉकेट. वन विभागाने दाखल केलेल्या एफआयआरमुळे वारथूर संतोषला पोलिसांनी अटक केली.

4/10

Varthur Santhosh Arrested Tiger Claw Case

वरथूर संतोषने गळ्यात घातलेल्या लॉकेटमध्ये वाघनखं होती. अनेकदा कार्यक्रमात तो वाघनखं असलेलं हे लॉकेट परिधान करुन अनेकदा दिसला होता. भारतीय कायद्यानुसार वाघनखं बाळगणं हा गुन्हा आहे.

5/10

Varthur Santhosh Arrested Tiger Claw Case

कोणीही वाघनखांची खरेदी अथवा विक्री करु शकत नाही. कोणत्याही परिस्थितीत भारतामध्ये वाघनखांचा व्यापार कायदेशीर ठरत नाही असं कायदा सांगतो. याच कायद्याचं उल्लंघन केल्यामुळे वरथूर संतोषला अटक करण्यात आली आहे.

6/10

Varthur Santhosh Arrested Tiger Claw Case

22 ऑक्टोबर रोजी रात्री वन विभागाचे काही अधिकारी बिग बॉस कन्नड 10 च्या सेटवर पोहोचले. त्यांनी कार्यक्रमाच्या निर्मात्यांकडून वरथूर संतोषचं लॉकेट तपासण्यासाठी मागवलं. या लॉकेटमधील वाघनखांची तपासणी आणि चाचण्या केल्यानंतर ही खरी वाघनखं असल्याचं सिद्ध झालं. त्यानंतर या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत वरथूर संतोषला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी निर्मात्यांकडे केली.

7/10

Varthur Santhosh Arrested Tiger Claw Case

यानंतर काही तासांमध्ये सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आणि वरथूर संतोष बिग बॉसच्या घरातून म्हणजे सेटवरुन बाहेर आला. वन विभागाने त्याला ताब्यात घेतलं.

8/10

Varthur Santhosh Arrested Tiger Claw Case

यासंदर्भात 'इंडिया टुडे'ला दिलेल्या माहितीनुसार प्रमुख वन अधिकारी रविंद्र कुमार यांनी, "त्याने वाघनखं परिधान केल्याची तक्रार आमच्याकडे नोंदवण्यात आली होती. तक्रार मिळाल्यानंतर आम्ही बिग बॉसच्या सेटवर जाऊन संबंधित अधिकाऱ्यांकडे वरथूर संतोषचं लॉकेट तपासण्याची मागणी केली. त्यानंतर ही खरी वाघनखं असल्याचं समजल्यानंतर आम्ही वरथूर संतोषचा ताबा मागितला. त्यांनी बऱ्याच चर्चेनंतर वारथूर संतोषचा ताबा दिला," अशी माहिती दिली. 

9/10

Varthur Santhosh Arrested Tiger Claw Case

"मी स्वत: या वाघनखांची तपासणी केली आणि ती खरी आहेत की नाही याची चाचपणी केली. आम्ही बिग बॉसच्या अधिकाऱ्यांना वरथूर संतोषला आमच्यासमोर हजर करावं असं सांगितलं. या वाघनखांसंदर्भात मी वरथूर संतोषकडे चौकशी केली असता त्याने होसूरमधून 3 वर्षांपूर्वी आपण ही वाघनखं विकत घेतल्याची माहिती दिली. त्याने ही कबुली कॅमेरासमोर दिली आणि आम्ही त्याला तिथेच ताब्यात घेतलं," असं रविंद्र कुमार म्हणाले.

10/10

Varthur Santhosh Arrested Tiger Claw Case

वरथूर संतोषने खरी वाघनखं बाळगत वनसंरक्षण कायदा 1972 चं उल्लंघन केलं. भारतामध्ये वाघ हा संरक्षित प्रजाती आहेत. वरथूर संतोषला यासाठी 3 ते 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.