CSK vs GT सामन्यात शुबमन गिलकडून घडली मोठी चूक; पराभवानंतर कर्णधाराला मोठा झटका!

CSK vs GT Shubman Gill Fined: आयपीएलच्या 17 व्या सिझनमध्ये गुजरात टायटन्सला पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं. दरम्यान यानंतर शुभमन गिलला अजून एक मोठा झटका बसला आहे. 

| Mar 27, 2024, 15:52 PM IST
1/7

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर आयपीएल 2024 च्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात गुजरातला पराभवानंतर अजून एक धक्का बसला आहे. 

2/7

या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळल्यानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

3/7

आयपीएल 2024 मधील हा पहिला स्लो ओव्हररेट दंड असून याप्रकरणी आयपीएलने एक निवेदन जारी केलंय.

4/7

आयपीएलच्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, 'गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलला चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर 26 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यादरम्यान स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे. 

5/7

गिलला स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळल्यानंतर आचारसंहितेअंतर्गत सिझनच्या गुन्ह्यासाठी 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

6/7

सध्या शुभमन गिलला फक्त दंड ठोठावण्यात आलाय परंतु आगामी सामन्यांमध्ये पुन्हा याच कारणासाठी दोषी आढळला तर त्याच्यावर एका सामन्याची बंदीही येऊ शकते.

7/7

shubman gill, shubman gill fined, shubman gill csk vs gt, slow over rate fine, csk vs gt, शुभमन गिल,