Mahashivratri Katha: भगवान शंकराच्या पाच मुलींची नावं माहितीये का? जाणून घ्या रंजक कथा

Lord Shiva 5 Daughter Story: भगवान शंकराचे पुत्र गणेश आणि कार्तिकेय यांच्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे, परंतु त्यांच्या पाच मुलींबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

| Mar 07, 2024, 14:58 PM IST

Mahashivratri Katha: मधुश्रवणीच्या कथेत भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या पाच मुलींचे वर्णन आहे. शिवपुराणातही एका कन्येचा उल्लेख आहे, जी मनसा आहे, ही नागांची देवी आहे.

1/7

मधुश्रवणीच्या कथेनुसार...

मधुश्रवणीच्या कथेनुसार, एकदा भगवान शंकर आणि माता पार्वती तलावात जलक्रीडा खेळत होते. त्याचवेळी योगायोगाने भगवान शंकराचे स्खलन झाले. 

2/7

जलक्रीडा

जलक्रीडा करत असताना भगवान शंकराने आपले वीर्य पानावर ठेवले. त्या वीर्यापासून पाच मुलींचा जन्म झाला. या मुली ना मानवी रुपात होत्या ना सापाच्या रुपात...

3/7

कन्येचे लाड

शिवलीलेतून पाच सर्प कन्या जन्माला आल्याची माहिती पार्वतीला नव्हती. मात्र, शंकर तलावाजवळ जाऊन आपल्या कन्येचे लाड देखील करत असे.

4/7

पार्वतीला संशय

एक दिवस पार्वतीला संशय आला. तेव्हा त्यांनी शंकरचा पाठलाग केला. त्यावेळी तलावात सर्प कन्यांबरोबर खेळताना पाहून माता पार्वतीला राग आला.

5/7

जन्माची कथा

पार्वतीने क्रोधा आल्याने पाच सर्प मुलींना मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शंकराने पार्वतीला रोखले आणि मुलींच्या जन्माची कथा सांगितली.

6/7

सर्प मुलींची नावं

भगवान शिवाच्या या सर्प मुलींची नावे जया, विशाहर, शामिलबारी, देव आणि दोताली अशी आहेत. या देवींच्या कृपेने घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही, अशी देखील मान्यता आहे.

7/7

Disclaimer

या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.