1/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/02/28/417885-modimbsfeb281.png)
आंतरराष्ट्रीय मंचांवर काश्मीर प्रश्नावर एकेकाळी पाकिस्तानचं समर्थन करणारा सौदी अरेबिया आता तटस्थ भूमिकेत आहे. पाकिस्तानच्या सर्व प्रयत्नांनंतरही सौदी अरेबियाने काश्मीरच्या मुद्यावर आपली तटस्थता कायम ठेवली आहे. आखाती देशांमध्ये निरंतर प्रयत्न करूनही पाठिंबा मिळत नसल्याने पाकिस्तानला मोठा दणका बसला आहे.
2/5
![](https://english.cdn.zeenews.com/images/spacer.gif)
उसांस फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव पंड्या यांचे म्हणणे आहे की, 2014 मध्ये भाजपची सत्ता आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सौदी अरेबियाचे संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत. ऑक्टोबर 2019 मध्ये पंतप्रधानांच्या रियाध दौर्यापासून सौदी अरेबियाने काश्मीरच्या मुद्दय़ावर आपली तटस्थता कायम ठेवली आहे. एवढेच नाही तर त्यांनी सीमेपलीकडून येणार्या दहशतवादाचा निषेधही केला.
3/5
![](https://english.cdn.zeenews.com/images/spacer.gif)
आंतरराष्ट्रीय मंचांवर सौदी अरेबियाने यापूर्वी काश्मीरच्या मुद्यावर पाकिस्तानला पाठिंबा दर्शविला होता. सध्या गोष्टी बदलल्या आहेत. काश्मीरच्या बाबतीत आता सौदी अरेबिया तटस्थ आहे. काश्मीर प्रश्नावर सौदी अरेबियाच्या नेतृत्वात इस्लामिक सहकार संघटनेच्या (ओआयसी) बैठकीची मागणी करण्याची मागणी झाल्यापासून सौदी अरेबियाशी असलेले पाकिस्तानचे अंतर आणखी वाढले आहे.
4/5
![](https://english.cdn.zeenews.com/images/spacer.gif)
सौदी संबंधातील हे अंतर आणखीनच तीव्र झाले जेव्हा पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी काश्मीरच्या मुद्यावर सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक न घेतल्यास पाकिस्तान हा इराण, मलेशिया आणि तुर्कीसोबत पाठिंब्यासाठी चर्चा करेल अशी धमकी दिली. त्यानंतर पाकिस्तानने सौदी अरेबियाचे मन वळवण्याचे सतत प्रयत्न केले पण सौदी अरेबिया आता पाकिस्तानपासून दूर गेलाय.
5/5
![](https://english.cdn.zeenews.com/images/spacer.gif)