Diwali 2022 : दिवाळी पार्टीसाठी ब्रेकअपमुळे खचलेले, प्रेमात पडलेले सर्व सेलिब्रिटी 'खास' ठिकाणी एकत्र

दिवाळीला धुमधडाक्यात सुरुवात झालीये हे बॉलिवूडमधलं एकंदरीत वातावरण पाहता स्पष्ट होत आहे. गेल्या काही दिवसांपासून बऱ्या सेलिब्रिटींनी दिवाळी पार्टीचं आयोजन केल्यामुळं एकमेकांच्या घरी या बॉलिवूडकरांची ये-जा सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. अशीच आणखी एक जंगी पार्टी नुकतीच पार पडली. सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा याच्या घरी यावेळी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. तिथं ब्रेकअपमुळे मी खचलेले असं म्हणणाऱ्या नोरा फतेहीपासून येत्या काही दिवसांत लग्न करणार असणारे सिद्धार्थ मल्होत्रा आणि किआरा अडवाणी हे Love Birds सुद्धा दिसले. 

Oct 21, 2022, 08:37 AM IST

Manish Malhotra Diwali Party: दिवाळीला धुमधडाक्यात सुरुवात झालीये हे बॉलिवूडमधलं एकंदरीत वातावरण पाहता स्पष्ट होत आहे. गेल्या काही दिवसांपासून बऱ्या सेलिब्रिटींनी दिवाळी पार्टीचं आयोजन केल्यामुळं एकमेकांच्या घरी या बॉलिवूडकरांची ये-जा सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. अशीच आणखी एक जंगी पार्टी नुकतीच पार पडली. सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा याच्या घरी यावेळी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. तिथं ब्रेकअपमुळे मी खचलेले असं म्हणणाऱ्या नोरा फतेहीपासून येत्या काही दिवसांत लग्न करणार असणारे सिद्धार्थ मल्होत्रा आणि किआरा अडवाणी हे Love Birds सुद्धा दिसले. 

1/7

Diwali 2022

Manish Malhotra Diwali Party

स्वत:च्याच घरी दिवाळी पार्टीचं आयोजन करणाऱ्या मनिषनं यावेळी रॉयल ब्लू कुर्ता आणि त्यावर काळ्या रंगाच्या बंडीची जोड दिली होती. 

2/7

Diwali 2022

Manish Malhotra Diwali Party

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा या पार्टीसाठी काळ्या- सोनेरी रंगाची संगत असणाऱ्या फेस्टीव्ह लूकमध्ये आला होता.

3/7

Diwali 2022

Manish Malhotra Diwali Party

निर्माता- दिग्दर्शक आणि मनिषचा खास मित्र करण जोहर या पार्टीसाठी पिवळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये आला होता. 

4/7

Diwali 2022

Manish Malhotra Diwali Party

अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि वरुण धवन मात्र पार्टीसाठी कॅज्युअल लूकमध्ये आले होते. 

5/7

Diwali 2022

Manish Malhotra Diwali Party

लोकप्रिय अभिनेत्री नीलम या पार्टीला सीक्वेन्स वर्क असणारा मरुन रंगाचा ड्रेस घालून आली होती. अतिशय सोबर लूकमध्ये तिचं सौंदर्य खुलून आलं होतं. 

6/7

Diwali 2022

Manish Malhotra Diwali Party

अभिनेत्री अनुषा दांडेकर हिनं पार्टीसाठी बेबी पिंक रंगाचा लेहंगा घातला होता. गळ्यात चोकर आणि एका बाजूनं मोकळे सोडलेले केस तिच्या लूकला चार चाँद लावत होते. 

7/7

Diwali 2022

Manish Malhotra Diwali Party

किआरा अडवाणी या पार्टीलाठी सोनेरी रंगाच्या साडीमध्ये कमाल दिसत होती. एका अर्थी सिड आणि तिच्या लूकमध्ये सोनेरी रंग कॉमन होता.