अनन्या पांडे ते श्रद्धा कपूर, अंबानींच्या गणपती दर्शनासाठी पोहोचले बॉलिवूड कलाकार, 'या' अभिनेत्रीच्या लुकने वेधलं लक्ष

7 सप्टेंबर रोजी मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानी गणपती बाप्पाचा भव्य आगमन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बॉलिवूड कलाकार देखील अँटिलियामध्ये गणपतीच्या दर्शनासाठी पोहोचले होते. 

| Sep 08, 2024, 14:55 PM IST
1/7

अँटिलियाचा राजा

Ganesh Chaturthi At Antilia: मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया येथे गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकार पोहोचले होते. यावेळी अनन्या पांडेपासून ते सारा अली खानपर्यंत अनेक कलाकार आपल्या पारंपरिक लूकमध्ये दिसले. 

2/7

सारा अली खान

साला अली खान ही मल्टीकलर बनारसी लेहेंग्यामध्ये अतिशय सुंदर दिसत होती. तिने जांभळ्या रंगाचा ब्लाउज आणि दुपट्टा परिधान केला होता. यावेळी तिचा भाऊ इब्राहिम देखील तिच्यासोबत होता. 

3/7

श्रद्धा कपूर

अभिनेत्री श्रद्धा कपूर देखील अँटिलिया येथे गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचली होती. तिने लाल रंगाचा सूट परिधान केला होता. यावेळी ती अगदी सिंपल लूकमध्ये दिसत होती. 

4/7

अनन्या पांडे

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिने सोनेरी रंगाच्या चमकदार साडी परिधान केली होती. यावेळी तिने साडीसोबत मॅचिंग हँडबॅग घेतली होती. 

5/7

अर्जुन कपूर

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर देखील अँटिलिया येथे गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी आला होता. यावेळी त्याने लाल रंगाचा कुर्ता परिधान केला होता. 

6/7

शनाया कपूर

संजय कपूरची मुलगी शनाया कपूरने यावेळी लाल रंगाची साडी परिधान केली होती. त्यासोबतच तिने हेवी ज्वेलरी आणि बन हेअरस्टाइलने तिचा लूक पूर्ण केला होता. 

7/7

जुनैद खान

आमिर खानचा मोठा मुलगा जुनैद खानही अँटिलिया येथे गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान करून आला होता.