bollywood celebs most expensive divorce : बॉलीवूडमधले सर्वात महागडे घटस्फोट; तुटलेल्या नात्यांची किंमत कोट्यावधीमध्ये

बॉलीवूड सेलिब्रेटी कायमच आपल्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असतात. पण त्याहूनही जास्त चर्चा होते ती त्यांच्या घटस्फोटाची. आत्तापर्यंत बॉलीवूडमध्ये घटस्फोटांचा सिलसिला हा चालू राहिला होता. अगदी चार ते पाच लग्न करण्यासाठीही बॉलीवूड सेलिब्रेटी ओळखले जातात. सध्या अशाच काही लोकप्रिय सेलिब्रेटींची चर्चा रंगली आहे. त्यातून त्यांच्या घटस्फोटाची चर्चा असली तरी त्यांच्यात सगळ्यात महागडा घटस्फोट कोणाचा झाला याचीच चर्चा अधिक आहे. तेव्हा जाणून घेऊया मलायका अरोरा - अरबाज खान ते सुझेन खान आणि हृतिक रोशनपर्यंत, या काही गाजलेल्या सेलिब्रेटींची महागडे घटस्फोट... 

Dec 11, 2022, 19:58 PM IST

Bollywood Celebs Most Expensive Divorce: बॉलीवूड सेलिब्रेटी कायमच आपल्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असतात. पण त्याहूनही जास्त चर्चा होते ती त्यांच्या घटस्फोटाची. आत्तापर्यंत बॉलीवूडमध्ये घटस्फोटांचा सिलसिला हा चालू राहिला होता. अगदी चार ते पाच लग्न करण्यासाठीही बॉलीवूड सेलिब्रेटी ओळखले जातात. सध्या अशाच काही लोकप्रिय सेलिब्रेटींची चर्चा रंगली आहे. त्यातून त्यांच्या घटस्फोटाची चर्चा असली तरी त्यांच्यात सगळ्यात महागडा घटस्फोट कोणाचा झाला याचीच चर्चा अधिक आहे. तेव्हा जाणून घेऊया मलायका अरोरा - अरबाज खान ते सुझेन खान आणि हृतिक रोशनपर्यंत, या काही गाजलेल्या सेलिब्रेटींची महागडे घटस्फोट... 

1/5

मलायका अरोरा आणि अरबाज खान

Malaika Arora and Arbaaz Khan

मलायका अरोरा आणि अरबाज खान हे दोघं 13 वर्ष विवाहबंधनात होते. त्याअगोदर ते एकमेकांना 5 वर्ष डेट करत होते. त्यांना एक मुलगा देखील आहे. परंतु त्यांनी आपलं वैवाहिक आयुष्य संपवण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतला त्यातून तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की मलायकानं पोटगी म्हणून अरबाजकडून 14-15 कोटी रूपये घेतले होते. आजही ते दोघं आपल्या मुलासाठी एकत्र येतात. मलायका सध्या अर्जून कपूरला डेट करतेय. 

2/5

सैफ अली खान आणि अमृता सिंग

Saif Ali Khan and Amruta Singh

सैफ अली खान आणि अमृता सिंग हे सर्वात जास्त चर्चेत राहिलेलं जोडपं आहे यांनीही लग्नाच्या 13 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांना सारा अली खान आणि इब्राहम अली खान ही दोन मुलंही आहेत. त्याचसोबत सैफनंही अमृताला मोठी पोटगी दिली आहे. हा आकाडा प्रसिद्ध झाला नाही तरी समोर आलेल्या माहितीनूसार, सैफनं अमृताला 5 कोटी रूपये दिले होते. 

3/5

हृतिक रोशन आणि सुझेन खान

Hritik Roshan and Sussanne Khan

2014 साली हृतिक रोशन आणि सुझेन खानचा घटस्फोट झाला. पण तेव्हा बातम्यांमध्ये त्यांच्या घटस्फोटापेक्षा हृतिकला सुझेनला द्याव्या लागणाऱ्या पोटगीचीच चर्चा होती. असं म्हटलं जातं की सुझेननं हृतिककडे 400 कोटी रूपयांच्या पोटगीची मागणी केली होती परंतु हृतिकनं ती नाकारली आणि तिला 380 कोटी रूपये दिले. 

4/5

अधुना भाबानी आणि फरहान अख्तर

Adhuna Bhabani and Faran Akhtar

असे काही बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत ज्यांनी एकमेकांसोबत बराच काळ घालवल्यानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. या यादीत फरहान अख्तर आणि अधुना भाबानी यांचीही नावे आहेत. लग्नाच्या 16 वर्षानंतर ते वेगळे झाले. फरहानने प्रत्येक महिन्याऐवजी एकाच वेळी पोटगी भरल्याचे सांगितले जाते. 

5/5

करिष्मा आणि संजय कपूर

Karishma Kapoor and Sanjay Kapoor

करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांनी 13 वर्षांचा संसार मोडल्यानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. करिश्माने संजयच्या वडिलांचे घर तिच्या नावावर करून घेतल्याचे बोलले जाते. एवढेच नाही तर करिश्माच्या मुलांच्या नावावर 14 कोटी रुपयांचा बॉण्ड आहे ज्यांचे मासिक व्याज 10 लाख रुपये आहे.