#DDLJ 'राज'- 'सिमरन'च्या रुपात झळणारे हे नवे चेहरे कसे वाटले?

बॉलिवूड म्हटलं की या झगमगणाऱ्या विश्वात कायमच काही ना काही घडामोडी सुरुच असतात. चित्रपटांची घोषणा, ट्रेलर लाँच, कलाकारांच्या नव्या भूमिकांची घोषणा, सेलिब्रिटी पार्टी, विविध सोहळे आणि बरंच काही. दर दिवशी या जगतात सुरु असणाऱ्या या घडामोडींमध्ये सध्या लक्ष वेधून गेली ती म्हणजे बी- टाऊन सेलिब्रिटींची थीम पार्टी. थीम पार्टी म्हटलं की, या पार्टीला नेमकं कोण कोणच्या रुपात आलं याचीही उत्सुकता आलीच. कलाकारांची गर्दी असणाऱ्या बी- टाऊनमधील या खास थीम पार्टीला अनेकांची उपस्थिती पाहायला मिळाली. ज्यामध्ये ९०च्या दशकातील काही लोकप्रिय भूमिका, पात्रांच्या रुपात ही कलाकार मंडळी दिसली. 

Dec 11, 2019, 11:55 AM IST

मुंबई : बॉलिवूड म्हटलं की या झगमगणाऱ्या विश्वात कायमच काही ना काही घडामोडी सुरुच असतात. चित्रपटांची घोषणा, ट्रेलर लाँच, कलाकारांच्या नव्या भूमिकांची घोषणा, सेलिब्रिटी पार्टी, विविध सोहळे आणि बरंच काही. दर दिवशी या जगतात सुरु असणाऱ्या या घडामोडींमध्ये सध्या लक्ष वेधून गेली ती म्हणजे बी- टाऊन सेलिब्रिटींची थीम पार्टी. थीम पार्टी म्हटलं की, या पार्टीला नेमकं कोण कोणच्या रुपात आलं याचीही उत्सुकता आलीच. कलाकारांची गर्दी असणाऱ्या बी- टाऊनमधील या खास थीम पार्टीला अनेकांची उपस्थिती पाहायला मिळाली. ज्यामध्ये ९०च्या दशकातील काही लोकप्रिय भूमिका, पात्रांच्या रुपात ही कलाकार मंडळी दिसली. 

1/6

#DDLJ : 'राज'- 'सिमरन'च्या रुपात झळणारे हे नवे चेहरे कसे वाटले?

जान्हवी कपूर हिने यावेळी, स्वत:च्याच आईचा गाजलेला चित्रपट चाँदनी पाहता, तसाच लूक केला होता. पिवळ्या रंगाची साडी, मोकळे केस असा तिचा लूक सर्वांची दाद मिळवून गेला.  (छाया सौजन्य- सोशल मीडिया) 

2/6

#DDLJ : 'राज'- 'सिमरन'च्या रुपात झळणारे हे नवे चेहरे कसे वाटले?

करण जोहर यावेळी 'कुछ कुछ होता है'मधील 'राहुल'च्या रुपात दिसला. इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत अमृतपाल बिंद्राच्या '९०`s'ची थीम असणाऱ्या या पार्टीत आपण सहभागी झाल्याची माहिती दिली. त्याच्या या 'राहुल'रुपी फोटोमध्ये 'टीना'च्या लूकमध्ये दिसली किंग खानची पत्नी गौरी खान. तर, 'अंजली'च्या रुपात दिसली पुतलू.  (छाया सौजन्य- सोशल मीडिया) 

3/6

#DDLJ : 'राज'- 'सिमरन'च्या रुपात झळणारे हे नवे चेहरे कसे वाटले?

अभिनेता अंगद बेदी आणि त्याची पत्नी, अभिनेत्री नेहा धुपिया या दोघांनीही यावेळी 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटातील 'राज' आणि 'सिमरन'चं रुप घेतल्याचं पाहायला मिळालं. (छाया सौजन्य- सोशल मीडिया) 

4/6

#DDLJ : 'राज'- 'सिमरन'च्या रुपात झळणारे हे नवे चेहरे कसे वाटले?

अस्सल पंजाबी अंदाजात या दोघांचंही 'राज-सिमरन'हे रुप पाहून सोशल मीडियावर चाहत्यांनीही त्यांना दाद दिली. (छाया सौजन्य- सोशल मीडिया) 

5/6

#DDLJ : 'राज'- 'सिमरन'च्या रुपात झळणारे हे नवे चेहरे कसे वाटले?

फक्त हेच सेलिब्रिटी नव्हे, तर बिग बी अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा हीसुद्धा यावेळी अशाच एका सेलिब्रिटीच्या रुपात दिसली. श्वेताने या थीम पार्टीसाठी तिच्या वडिलांचा म्हणजेच अमिताभ बच्चन यांचा लूक निवडला होता. (छाया सौजन्य- सोशल मीडिया) 

6/6

#DDLJ : 'राज'- 'सिमरन'च्या रुपात झळणारे हे नवे चेहरे कसे वाटले?

'जुम्मा- चुम्मा' या गाण्यातील त्यांच्या लूकप्रमाणेच श्वेताही तयार झाली होती. तिला पार्टीत साथ मिळाली ती म्हणजे अभिनेता सिर्धार्थ मल्होत्रा याची.  (छाया सौजन्य- सोशल मीडिया)