PHOTO : सलमान खानच्या चित्रपटात बॅकग्राऊंट डान्सर झाला बॉलिवूडमधील टॉप एक्शन HERO, 13 वर्षात जमवली करोडोंची संपत्ती

Entertainment : बॉलिवूडशी काही संबंध नसतानाही या इंडस्ट्रीत आपलं नशीब आजमवण्यासाठी अनेक कलाकार आलेत. काही कलाकार आजही संघर्ष करत आहेत. तर शाहरुख खान, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आयुष्मानसारखे अभिनेते बॉलिवूडमध्ये आपली जादू चालवत आहे. आज आम्ही अशा कलाकराबद्दल बोलणार आहोत जो सलमान खानच्या चित्रपटात बॅकग्राऊंट डान्सर म्हणून सुरुवात केली आणि मग...

Mar 05, 2024, 16:03 PM IST
1/7

सलमान खानच्या चित्रपटात बॅकग्राऊंट डान्सर असणारा हा कलाकार आज बॉलिवूडमधील टॉप ॲक्शन हिरो आहे. त्याच्या चित्रपटातील खतरनाक ॲक्शन आणि स्टंट सीक्वेन्स पाहून प्रेक्षकांची बोलती बंद होते. या अभिनेत्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात साऊथमधून केली. त्यानंतर बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री घेतली.   

2/7

आम्ही बोलत आहोत, विद्युत जामवाल या अभिनेत्याबद्दल. विद्युतचा जन्म हा जम्मूमधील एका लष्करी अधिकाऱ्याच्या घरी झाला. वडिलांच्या वारंवार बदल्या झाल्यामुळे विद्युतला भारतात अनेक ठिकाणी फिरण्याची संधी मिळाली. केरळमधील पलक्कडमधील एका आश्रमात वयाच्या अवघ्या 3 व्या वर्षी त्यांनी कलारीपयट्टूचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. 

3/7

मीडिया रिपोर्टनुसार हिरो बनण्याआधी विद्युत जामवालने सलमान खानच्या 2004 मध्ये रिलीज झालेल्या 'दिल ने जिसे अपना कहा' या चित्रपटातील 'गो बल्ले बल्ले' गाण्यात बॅकग्राउंडर डान्सर म्हणून काम केलं होतं. यानंतर विद्युत जामवालने साऊथ सिनेमा 'शक्ती' या तेलुगू सिनेमातून अभिनयला सुरुवात केली. 

4/7

त्यानंतर जॉन अब्राहमच्या 'फोर्स'मधून विद्युतने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. हा सिनेमा 2001 मध्ये रिलीज झाला होता. चित्रपटात जॉन अब्राहम आणि विद्युत जामवाल यांच्यात एक जबरदस्त ॲक्शन सीन आजही प्रेक्षकांना पाहिला आवडतो. 

5/7

त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक हिंदी चित्रपटांमध्ये आपले ॲक्शन कौशल्य दाखवलं आहे. 'कमांडो', 'बुलेट राजा', 'कमांडो 2', 'बादशाहो', 'जंगली', 'कमांडो 3', 'खुदा हाफिज' या चित्रपटातून त्याने जादू दाखवली आहे. 

6/7

विद्युत जामवाल हा बॉलिवूडमधील एक मोठा स्टार असून तो एका चित्रपटासाठी भरमसाठ मानधन घेतो. वृत्तानुसार, विद्युत जामवाल एका चित्रपटासाठी निर्मात्यांकडून 4 कोटी रुपये मानधन घेतो असं म्हटलं जातं. 

7/7

ॲक्शन हिरो विद्युत जामवाल लक्झरी लाइफ तर जगतोय शिवाय त्याच्याकडे 1.20 कोटी रुपयांची पोर्श केयेन, 55 लाख रुपयांची जॅग्वार एक्सएफ आणि लॅम्बोर्गिनी हुराकन सारख्या महागड्या आणि आलिशान कार आहेत. त्यांनी 13 वर्षात सुमारे 50 कोटी रुपयांची संपत्ती कमावली आहेत.