गर्भवती आईसोबत अभिनेत्रीनं गाठला भारत; उपासमारीमुळं शरीराचा सापळा, आज कुठेय ती Heroine?

प्रचंड अडचणींचा सामना करत लहानाची मोठी झाली ही अभिनेत्री. कमी वयातच केली कारकिर्दीची सुरुवात... ओळखलं का तिचं नाव? 

Jan 02, 2023, 13:49 PM IST

Entertainment News : प्रचंड अडचणींचा सामना करत लहानाची मोठी झाली ही अभिनेत्री. कमी वयातच केली कारकिर्दीची सुरुवात... ओळखलं का तिचं नाव? 

 

1/5

Bollywood veteran Actress helen life struggle success story

Entertainment News : असं म्हणतात की नशिब कधी कोणतं वळण घेईल याचा काहीच नेम नसतो. त्यामुळं आज तुम्हाला अडचणी येत असल्या तरीही आयुष्यात पुढे केव्हातरी तुम्ही सुखी आयुष्य नक्की जगाल हा आशावाद मात्र सोडू नका.   

2/5

Bollywood veteran Actress helen life struggle success story

नशिबाच्या खेळाबाबत एकाएकी बोलण्याचं कारण म्हणजे एका गाजलेल्या अभिनेत्रीचं आयुष्य. हिंदी कलाजगतामध्ये कॅब्रे हा प्रकार रुजवण्यामध्ये मोलाचं योगदान देणारी ही अभिनेत्री म्हणजे हेलन. (Actress helen)

3/5

Bollywood veteran Actress helen life struggle success story

हेलन यांनी लोकप्रियतेचं शिखर गाठलं, प्रेक्षकांना वेड लावलं हे सर्वच जाणतात. पण, त्यांच्या पूर्वायुष्याविषयी तुम्हाला फार कमी माहिती असेल. अवघ्या 3 वर्षांच्या वयात हेलन यांनी सुमारे 800 किमींचा प्रवास करत आईसोबत भारत (India) देश गाठला होता. बर्मा (Burma) येथून त्या आल्या होत्या. परिस्थिती अतिशय बिकट होती. आईचा गर्भपात झाला होता, भावाला गमवावं लागलं होतं अडचणी काही थांबत नव्हत्या. हेलन यांचा जन्म रंगून (Rangoon), बर्मा येथे झाला होता. त्यांची आई मुळची बर्माची तर, वडील फ्रेंच (French). पतीपासून विभक्त झाल्यानंतर हेलन यांच्या आईनं ब्रिटीश वंशाच्या रिचर्डसन यांच्याशी दुसरं लग्न केलं. 

4/5

Bollywood veteran Actress helen life struggle success story

दुसऱ्या विश्वयुद्धात (Second world war) झालेल्या बॉम्ब हल्ल्यात हेलन यांनी वडिलांना गमावलं. पुढे जपाननं बर्मावर ताबा घेत तिथून नागरिकांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यावेळी हेलन यांच्या आईनं कसाबसा जीव वाचवत तिथून पळ काढला. अनेक गावं आणि जंगलं ओलांडत त्यांनी भारक गाठला. हेलन यांच्या आईचा गर्भपात झाला होता. अन्नपाण्यापासून वंचित असल्यामुळं त्यांच्या शरीराचा सापळाच होणं बाकी राहिलेलं. आसामला पोहोचताच सैन्यानं त्यांच्या आईला रुग्णालयात दाखल केलं. पुढे परिस्थिती बदलली आणि हेलन यांचं कुटुंब कोलकाता आणि त्यानंतर मुंबईत स्थायिक झालं. 

5/5

Bollywood veteran Actress helen life struggle success story

(Actress helen life struggle ) गरिबी इतकी होती, की वयाच्या 13 व्या वर्षी हेलन यांनी शिक्षणही सोडलं. कुटुंबाशी चांगलं नातं असणाऱ्या डान्सर कुकू यांनी हेलनला चांगलं प्रशिक्षण देत कलाजगतात पहिली संधी दिली. 1951 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शाबिस्तान' आणि 'आवारा' या चित्रपटांमध्ये डान्स कॅमिओ करण्याची संधी हेलन यांना मिळाली. वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी 'हावडा ब्रिज' या चित्रपटातून सर्वांची मनं जिंकली आणि इथून कधीच मागे वळून पाहिलं नाही. भारतीय कलाजगतामध्ये दिलेल्या योगदानासाठी हेलन यांचा केंद्र शासनानं 2009 मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता.