पत्ता सापडला, जगात एलियन्स कुठे आहेत? 'या' देशात दिसले 1000 UFO
एलियन्सच्या अस्तित्वाबाबत ब्रिटनने अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. ब्रिटनमध्ये 1000 पेक्षा जास्त UFO दिसले एलियन्स कुठे आहेत याचा देखील खुलासा करण्यात आला आहे.
Alien Planet Found : परग्रहावरील सजीव अर्थात एलियन्स बाबत नेहमीच सर्वांना कुतूहल वाटत आले. एलियन्सच्या अस्तित्वबाबत आजवर अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले आहेत. एलियन नेमकं कुठे आहेत. या बाबतची ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यातच आता ब्रिटनमध्ये अडीच वर्षात सुमारे 1000 यूएफओ दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. सूर्यमालेबाहेर एलियन्स असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.